संस्था परिचय‘आम्ही लेखिका-तुम्ही लेखिका’ हा नाशिक येथील साहित्यिक महिला मंच म्हणजे लिहित्या व सर्जक महिलांसाठी असलेला हक्काचा मंच आहे. साहित्यिक, प्रा. डॉ. प्रतिभा जाधव, अॅड.मीलन कोहर, ज्योत्स्ना पाटील, स्वाती पाचपांडे, आरती डिंगोरे, रंजना शेलार या धडपड्या मैत्रिणींच्या संकल्पनेतून हा मंच दि.२ मार्च २०१९ रोजीच्या साकार झाला. खरे पाहता या मंचाचे पुनर्निर्मिती झाली आहे. कारण स्वयंपाकघर, पालकत्व ते अर्थकारण, पर्यावरण, तंत्रज्ञान, तरु णाई, वृद्धांचे प्रश्न, अन्याय, अत्याचार इत्यादी सर्व विषयांवर लिहिणाऱ्या अस्वस्थ महिला एकत्रित आल्या. विविध विषयांवर विचारमंथन करून लिहिण्यास सुरु वात केली. एक मोठा महिला वाचक वर्ग जोडला. वाचक महिला आता लिहू लागल्या, परंतु त्यांना व्यक्त होण्यासाठी मंच नव्हता. वा अधिक वावही मिळत नव्हता. या समाजात पुरु षप्रधान संस्कृतीमुळे महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यातही पुन्हा शोषण, भेदाभेद, जात-धर्म-पंथ विषमता येतेच. अशावेळी डॉ. प्रतिभा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दि. ३ जानेवारी २०१९ रोजी क्र ांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवशी ‘आम्ही लेखिका-तुम्ही लेखिका’च्या माध्यमातून वेगवान झाले आहे. या मंचाची कार्यकारिणीत अध्यक्षा डॉ.प्रतिभा जाधव, उपाध्यक्ष मीलन कोहर, सचिव अलका कुलकर्णी, सहसचिव ज्योत्स्ना पाटील, कोषाध्यक्ष प्रीती गायकवाड, समन्वयक सुमती टापसे तसेच संचालक रंजना शेलार, आरती डिंगोरे, स्वाती पाचपांडे, सुवर्णा बच्छावसुमती पवार, या मंचाने दि.२४ मार्च २०१९ रोजी घेतले. नाशिक शाखेतर्फे दि. २२ सप्टेंबर २०१९ रोजी झालेले प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन व राज्यस्तरीय खुले कविसंमेलन झाले. तसेच प्रत्येक वर्षी एक राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन या मंचातर्फे घेण्यात येणार आहे. नाशिक शाखेच्या वतीने महिला विविध उपक्र म राबवित आहेत. या मंचातर्फे साहित्यिक महिलांची पुस्तकेही मंच प्रकाशित करणार आहे.
अक्षरनाते जोडू, ऊर्जा देऊ-घेऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 11:57 PM