लोहोणेर : जनता विद्यालय लोहोणेरच्या नाट्य चमूने जिल्हास्तरीय विज्ञान नाट्यमहोत्सवात सादर केलेली पर्यावरण संवर्धन नाटिका ‘आम्हालाही जगू द्या’ने प्रथम क्र मांक मिळवून विभाग स्तरावर निवड झाली आहे. लोहोणेर येथील जनता विद्यालयाने आदर्श विद्यालय नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान नाट्यमहोत्सवात प्रथम क्र मांक मिळवत घवघवीत यश संपादन करीत विभागस्तरीय विज्ञान नाट्यमहोत्सवासाठी निवड झाली आहे. जनता विद्यालयाचे शिक्षक व्ही.डी. पवार व एस.बी. एखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे विद्यार्थी अथर्व समुद्र (राजा), भावेश महाजन (प्रधान), जयेश महाजन (लाकूडतोड्या व प्रदूषण), नीरज शेवाळे (बिबट्या), यशअहिरे (लाकूडतोड्या व कॉमन मॅन), नूतन शेवाळे (वसुंधरा), जान्हवी आहिरे (ससा), श्रावनी बच्छाव (प्रदूषण व मोर) आदी विद्यार्थ्यांनी विविध भूमिका साकारत पर्यावरण संवर्धन या विषयावर नाटिका सादर केली. सदर नाटिकेतून विद्यार्थ्यांनी पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणाचा होत चाललेला ºहास व दिवसेंदिवस होणारी जंगलतोड यामुळे होणारे परिणाम आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी काय उपाय केले पाहिजे व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हे यश प्राप्त केले.
‘आम्हालाही ही जगू द्या’ विभागीय स्तरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 5:51 PM