लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मालेगाव शहरातील प्लॅस्टिक असोसिएशनचा प्रश्नमार्गी लावण्याचे आश्वासन केंद्रीय परिवहन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले. खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे जावडेकर यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.हातमाग उद्योगावर अवलंबून असलेल्या मालेगावची प्लॅस्टिकव यंत्रमाग उद्योगासारखे शहर म्हणून भारतात ओळख आहे. मालेगावची लोकसंख्या १२ लाख असून, या उद्योगामुळे येथे रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.आपला व्यवसाय पूर्ववत सुरळीत सुरू व्हावा व मजुरांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी संघर्ष सुरू होता. खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी केंद्रीय परिवहन मंत्री जावडेकर यांची भेट घेतली.यावेळी प्लॅस्टिक उद्योगांचा हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, प्लॅस्टिक उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश झुनझुनवाला, तालुकाध्यक्ष नीलेश कचवे, बाळासाहेब सावकार यांनी त्यांचे प्रश्न मांडले. शिष्टमंडळात आरीफ हुसेन, विजय बाहेती, शरद गुप्ता, इस्माईल पठाण, मोहंमद फारुख कुरेशी यांचा समावेश होता.मालेगावचे उद्योजक त्रस्त शासनाची कोणतीही मदत किंवा अनुदान न घेता येथील कारखानदार रोजगार उपलब्ध करून देत आहेत. न्यायालयीन हस्तक्षेपामुळे हरित लवादाकडून कोणतीही शहानिशा न करता प्लॅस्टिक उद्योगावर बंदी घालण्याचा घाट घातला गेला. दीड वर्षापासून शहरातील प्लॅस्टिक उद्योजक त्रस्त झाले आहेत.
प्लॅस्टिक असोसिएशनचा प्रश्न मार्गी लावू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 10:41 PM
मालेगाव : मालेगाव शहरातील प्लॅस्टिक असोसिएशनचा प्रश्नमार्गी लावण्याचे आश्वासन केंद्रीय परिवहन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले. खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे जावडेकर यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
ठळक मुद्देजावडेकर : दिल्लीत शिष्टमंडळाने घेतली भेट