जागतिक भूगोल दिनानिमित्त...डिसेंबरपासून पृथ्वीचे उत्तरायन सुरू झाले असून, आपल्या हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १४ जानेवारीपासून दिवसाचा कालावधी वाढत जातो. कारण पृथ्वीचा उत्तर धु्रव हा सुर्याकडे हळूहळू झुकण्यास प्रारंभ होतो. जो थेट २१ जूनपर्यंत पृथ्वीचा उत्तर धु्रव हा २३ अंशाने सुर्याकडे झुकलेला असतो. म्हणून भौगोलिकदृष्ट्या २२ डिसेंबर ते १४ जानेवारी हा काळ महत्वाचा ठरतो. ह्या काळात १४ जानेवारी भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. या कालावधीत अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये भौगोलिक प्रदर्शन, भौगोलिक सहली, चर्चासत्रे, नकाशावाचन, वृक्षारोपण या सारख्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु असे उपक्रम घेवून काय साध्य होणार आहे? त्यासाठी समाजाने आपण राहतो त्या भू-गोलासंबंधी म्हणजे पृथ्वीसंबंधी अधिक जागृक होऊन पृथ्वीच्या म्हणजे पर्यावरणाच्या रक्षणासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.भूगोलाला सर्व शास्त्रांची जननी म्हटले जाते आणि म्हणूनच पर्यावरणाचे आजचे जे जिवंत विषय, समस्या यावर खऱ्या अर्थाने आपण आता फक्त न बोलता कार्यवाही करण्यास सज्ज झाले पाहिजे. आपण या पृथ्वीतलावर राहतो तर आपले प्रत्येकाचे या पृथ्वीसंबंधी, पर्यावरणासंबंधी काही कर्तव्य व भूमिका असल्या पाहिजेत हे आपण फार विसरून गेलो आहोत. जे काही करायचे ते शासनाने करावे किंवा दुसºयाने करावे ही प्रत्येकाची भूमिका असते यातच पर्यावरणाचा खुप मोठ्या प्रमाणावर ºहास होताना दिसतो. माणूस बुद्धीमत्ता व स्वार्थाच्या जोरावर अस्थिर विज्ञानाच्या आधारे अंतरिक्षात गेला तिथे तो वास्तव्य करू लागला व तिथेही त्याने प्रदुषण करायला सुरूवात केली. ज्या पृथ्वीवर आपण राहतो त्या संबंधी तो अधिक बेजबाबदार झाला आहे.अठराव्या शतकाच्या प्रारंभी मनुष्याने कुतूहल महत्वाकांक्षा, इच्छाशक्ती व प्रगतीच्या ध्यास या जोरावर निरनिराळे शोध लावण्यास सुरूवात केली त्यात त्याने कपड्यांपासून ते थेट विनाश्रम करू शकेल अशा वाहनापर्यंत समावेश होता हळूहळू तो बुद्धीमत्तेच्या स्वार्थासाठी जोरावर शोधाच्या आहारी गेला की तो आपल्या गरजापेक्षाही जास्त या शोधाचा उपभोग घेऊ लागला. यातून मानवाच्या जीवनात विकृती निर्माण होणार हे त्याच्या मनातही नव्हते. हळूहळू त्याने हवा, पाणी, जमीन, वनस्पती यासारख्या नैसर्गिक घटकांमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरूवात झाली. त्याने तयार केलेल्या परंतु त्याला नको असलेल्या निरोपयोगी गोष्टीतो सर्रासपणे हवेत सोडू लागला. पाण्यात मानवनिर्मित घटक निसर्गालाच आव्हान देऊ लागली. निर्सगातील शुद्धता भ्रष्ट करू लागला. प्रदुषणाच्या या राक्षसाने आपले हातपाय पसरविण्यास सुरूवात केली व आज बघता बघता सगळ्याच घटकात तो आत मिसळून गेला आहे आणियाचे विक्राळ रूप आज आपल्याला बघायला मिळत आहे. त्याने सर्व पृथ्वीवरील नैसर्गिक वातावरणास शह दिला. मानवानेच कळत न कळत स्वत:वर केलेले ते सायलंट किलर आहे. जे भविष्यात मानवाला नष्ट करणार आहे. भारत एकीकडे बलशाही राष्टÑाची स्वप्न बघतो आहे तर दुरसीकडे आपण निर्माण केलेल्या गोष्टींमुळे अनेक नैसर्गिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरवर्षी नद्यांना पूर येतो तर काही प्रदेशात दुष्काळ पडतो आहे. या विरोधाभासी घटनांनी सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. मृदा नापिकी होताहेत, शेतीतून येणाºया पिकातून अन्नधान्यातूनही अनेक रासायनिक घटकामुळे मानवाला कॅन्सर सारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. मानवाच्या तडाख्यातून गंगा, यमुना, गोदावरी अशा अनेक नद्याही सुटलेल्या नाहीत. दिल्ली सारख्या शहरातून दिवसाला करोडो गॅलन कारखान्याचे व ड्रेनेजचे पाणी सोडले जाते. त्यामुळे नद्या धोक्यात आल्या आहेत. पृथ्वीवरील अनेक वनस्पती, प्राणी, सजीवांचे जीवन धोक्यात आले आहे. ज्या नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करायचे असेल तर आपल्या वसुंधरेसाठी जागृत होऊन पर्यवरणास जपायला हवे. पर्यावरणाचे रक्षण व प्रदुषणाला आळा घातला तरच खºया अर्थाने भूगोल दिन साजरा करण्याचे साध्य होईल.- प्रा. स्रेहल निवृत्ती कासार-मरकड, भूगोल विभाग, व्हि.एन. नाईक महाविद्यालय, नाशिक
चला वसुंधरेचे जतन करू या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 2:39 PM