कळवण : तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीत शनिवारी (दि.२२) विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे आदेश नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डा.ॅ नरेश गिते यांनी दिले असल्याने या ग्रामसभांमध्ये पावसाळ्यात पाणी साठवणूक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कळवण तालुक्यातील सरपंचांना पाठविलेल्या पत्राचे वाचन करण्यात आले.दरम्यान पत्र वाचन करण्यात येऊन ग्रामसभा संपन्न झाल्याची माहिती गटविकासधिकारी डी. एम. बहिरम यांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्राद्वारे पावसाचे पाणी साठवण करण्याबाबत आवाहन केले. पावसाचे जास्तीत जास्त पाणी संकलित करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी बांध बंदिस्ती, नदी नाल्यांमध्ये बंधारे, तलावांचे खोलीकरण, वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. या उपाययोजनांच्या माध्यमातून पाण्याची साठवणूक होईल. गावात ग्रामसभा आयोजित करु न या पत्राचे वाचन करावे तसेच पंतप्रधानांनी सुचवलेल्या जलसंधारणाच्या उपाययोजनांवर विचार विनिमय करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याने तालुक्यात झालेल्या ग्रामसभांमध्ये या विषयावर चर्चा झाली.जुनीबेज येथे विशेष ग्रामसभा-पंतप्रधान नरेंद्र मोदीसो यांचे सरपंचांना आलेल्या पत्राचे वाचन करण्यात येऊन पावसाळ्यात पावसाचे पाणी संकलन व संचयन करणे व वृक्षारोपण पर्यावरण संवर्धन या विषयावर ग्रामसभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.ग्रामसभेचे अध्यक्षस्थानी सरपंच अहिल्या ऐडाईत होत्या. यावेळी उपसरपंच संजय बच्छाव, कळवण बाजार समिती संचालक शितलकुमार अहिरे, शिवसेनेचे दशरथ बच्छाव, बळवंत बच्छाव, शशिकांत सोनवणे ग्रामपंचायत सदस्य वैशाली अहिरे, विनोद खैरनार, गोपाळ बच्छाव, दिपक खैरनार, सखाराम पवार, विठ्ठल बच्छाव, चंद्रकांत पाटील, पोलिस पाटील अशोक लाडे, किशोर चौरे, सुभाष खैरनार, अंगणवाडी सेविका निर्मला बच्छाव, विजया बच्छाव, दादाजी बच्छाव आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पावसाळ्यातील पाणी साठवणूक करण्याचे सरपंचांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 7:17 PM
कळवण : तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीत शनिवारी (दि.२२) विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे आदेश नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डा.ॅ नरेश गिते यांनी दिले असल्याने या ग्रामसभांमध्ये पावसाळ्यात पाणी साठवणूक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कळवण तालुक्यातील सरपंचांना पाठविलेल्या पत्राचे वाचन करण्यात आले.
ठळक मुद्देकळवण : विशेष ग्रामसभेत पंतप्रधान मोदी यांच्या पत्राचे वाचन