देशमाने : आलिशान कारमधून कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या जनावरांची पाठीमागून येणाऱ्या वाहन धारकाच्या जगतेमुळे सुटका करण्यात आली. मात्र कारचालक अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे. पोलीस व स्थानिकांनी कारमध्ये कोंबलेल्या जनावरांची सुखरूप सुटका केली.बुुधवारी (दि.२२) पहाटेच्या सुमारास येवल्याकडून नाशिककडे जाणाºया चौयूरोलेट करोला (एम.एच.०४-बी.डब्लू ५९७१) या कारमधून तीन जनावरे बेशुद्ध करून कोंबून चालविली होती. कारची मागील डिक्कीतील जनावरांच्या हालचालीमुळे डिक्कीचा दरवाजा उघडला गेला. यावेळेस पाठीमागून येणार्या वाहनचालकांच्या सर्व प्रकार लक्षात आल्याने त्यांनी कार थांबविण्यास सांगितली. कार उभी करत चालक अंधाराचा फायदा घेत फरार झाला.रस्त्यालगतचे वस्तीवरील लोकांनी धाव घेत घटनेची माहिती तालुका पोलिसांना कळविताच पोलीस घटनास्थळावर त्विरत हजर झाले. पो. ह. वसंत हेबांडे, कचरू उगले, पो.कॉ. सुभाष पवार यांचेसह स्थानिक नागरिक अनिल गडाख, विनायक पवार, तुकाराम जगताप, गोविद तळेकर, सुधाकर तळेकर, बाळासाहेब पवार आदींनी शर्थीचे प्रयत्न करत तीनही जनावरे कार मधून बाहेर काढले. मुखेड पशुवैद्यकीय अधिकारी डॉ जामदार यांनी उपचार केले.दरम्यान, सकाळी १०.३० वा. दरम्यान अज्ञात इसमांनी कार पेटवून देत फरार झाले. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पो. नि. संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. पठाडे करत आहे.चोरु न चालविलेले जनावरे ही पाळीव नसून ती मोकाट असल्याची मत शेतकर्यांनी व्यक्त केली. कारण त्यांची मांयदळ अंगकाठी व दोराने बांधल्याचा कोणत्याच खुणा त्यांच्या अंगावर दिसत नाही.(फोटो २२ देशमाने)
कत्तलीसाठी जाणारे जनावरांची मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 6:23 PM
देशमाने : आलिशान कारमधून कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या जनावरांची पाठीमागून येणाऱ्या वाहन धारकाच्या जगतेमुळे सुटका करण्यात आली. मात्र कारचालक अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे. पोलीस व स्थानिकांनी कारमध्ये कोंबलेल्या जनावरांची सुखरूप सुटका केली.
ठळक मुद्देदेशमाने : पहाटेचा प्रकार; संबंधितांची कार दिली पेटवून