चांदवड- ‘‘ग्रंथालयात येणाऱ्याना तात्काळ पुस्तके उपलब्ध होणे जरूरीचे असते. ग्रंथालयाच्या तात्काळ व अद्ययावत सुविधा वाचकांना ग्रंथालयांकडे आकृष्ट करतात. ग्रंथालय ही जर देवालया इतकीच पूजनीय झाली तर आपण विकास सर्वांगाने करू’’, असे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी केले. चांदवड येथील आबड-लोढा-जैन महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र पदाच्या पदवी शिक्षण कार्यक्र माच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. सुरेश पाटील उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी सहनिमंत्रक -डॉ मनोहर केदार, प्रा.पी.व्ही.गोºहे , प्रा.नीलेश नागरे, प्रा.गणेश कुमावत, प्रा.गणेश शिर्के उपस्थित होते.पाहुण्याचा परिचय प्रा.पी.व्ही.गोºहे व प्रा.पी.आर.सोहनी यांनी करून दिला. आपल्या उद्घाटनपर मनोगतात प्रा. गाडेकर म्हणाले की, ‘‘ग्रंथालयातील कोणतेही काम असो दुसºयांची आशा न बाळगता आपण करावे आणि आपण ग्रंथालयातील काम शिकून घ्यावे, काम कोणतही कमी अधिक नाही. शेवटी अनुभव हाच महान असतो. म्हणून ग्रंथालयातील काम आपण अनुभवातून देखील शिकावे. तसेच त्यांनी त्यांचा जीवन प्रवास कसा झाला. या ग्रंथालय क्षेत्रात ते कसे आले. याची माहिती देऊन त्यांचे अनुभव सांगितले आणि ग्रंथालयशास्त्र अभ्यासक्र मास आलेल्या विद्यार्थ्याचे स्वागत त्यांनी केले. अध्यक्षीय भाषण करतांना उपप्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी सांगितले की, ‘‘विद्यापीठ हे कुठलेच लहान अथवा मोठे नाही. आपण त्यांना कमी अधिक लेखू नये. लोकमान्य टिळक सुद्धा म्हणत, ग्रंथालयात जा वाचन करा.
चांदवड महाविद्यालयात ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 5:51 PM