नाशिक : मोटार वाहन अधिनियमात सुधारणा करीत उपनियमांमध्ये बदल करून सर्वसामान्य परवानाधारक वाहनचालक आणि मालकांवर लादण्यात आलेल्या जाचक अटी व दंडाच्या रकमेत कपात करण्यास परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सहमती दर्शविली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेने पाठपुरावा केला होता. राज्य सरकारने एक दिवस परवाना नूतनीकरणाचा उशिराचा दंड पाच हजार इतका तर ट्रक नॅशनल परवाना दीड हजार रुपये इतका केला होता. या अवास्तव दंडाच्या विरोधात महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेने थेट कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधून वाहनचालक व मालकांवर आकारण्यात येणारे भरमसाठ शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. ठाकरे यांनीही त्यास सहमती दर्शवित, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार वांद्रे परिवहन आयुक्त कार्यालयात परिवहन मंत्री दिवाकर रावते, आयुक्त श्याम वर्धने, शिवसेना उपनेते हाजी अराफत शेख यांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यात नियोजित संप मागे घेण्यात आला. तोतया पोलिसांनी वृद्धास लुटलेनाशिक : शहरात घरफोडीबरोबरच तोतया पोलिसांचा सुळसुळाट सुरू झाला असून, इंदिरानगरमधील एका वृद्धास तोतया पोलिसांनी लुटल्याची घटना घडली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजीवनगर मधील बाळकृष्ण लक्ष्मण कर्पे हे २४ फेब्रुवारी रोजी सकाळी फिरण्यासाठी निघाले़ सकाळी आठ वाजेच्या सुमारास भगवती चौकात दोघा भामट्यांनी कर्पे यांना गाठून पोलीस असल्याची बतावणी केली़ तसेच गुन्हेगारी घटना घडत असताना सोन्याचे दागिने का घालून फिरता असे दरडावत दागिने काढून ठेवण्यास सांगितले़ यानंतर कर्पे यांनी काढून ठेवलेले ५४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट व अंगठी रुमालात बांधून देण्याचा बहाणा करून हे दोन्ही दागिने लंपास केले़ याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
परवाना नूतनीकरण दंडात कपात
By admin | Published: March 09, 2016 10:17 PM