शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
2
टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
3
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
4
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
5
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
6
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
7
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
8
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
9
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
10
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
11
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
12
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
13
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
14
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
15
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
16
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
17
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
18
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
19
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
20
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी

परवाना नूतनीकरण दंडात कपात

By admin | Published: March 08, 2016 11:25 PM

परवाना नूतनीकरण दंडात कपात

 नाशिक : मोटार वाहन अधिनियमात सुधारणा करीत उपनियमांमध्ये बदल करून सर्वसामान्य परवानाधारक वाहनचालक आणि मालकांवर लादण्यात आलेल्या जाचक अटी व दंडाच्या रकमेत कपात करण्यास परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सहमती दर्शविली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेने पाठपुरावा केला होता. राज्य सरकारने एक दिवस परवाना नूतनीकरणाचा उशिराचा दंड पाच हजार इतका तर ट्रक नॅशनल परवाना दीड हजार रुपये इतका केला होता. या अवास्तव दंडाच्या विरोधात महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेने थेट कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधून वाहनचालक व मालकांवर आकारण्यात येणारे भरमसाठ शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. ठाकरे यांनीही त्यास सहमती दर्शवित, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार वांद्रे परिवहन आयुक्त कार्यालयात परिवहन मंत्री दिवाकर रावते, आयुक्त श्याम वर्धने, शिवसेना उपनेते हाजी अराफत शेख यांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यात नियोजित संप मागे घेण्यात आला. त्याचप्रमाणे परवाना नूतनीकरणाचा उशिराचा दंड पाच हजार रुपयांवरून आता पहिल्या पंधरा दिवसांकरिता दोनशे, दोन ते चार महिन्यांकरिता पाचशे, एक वर्षानंतर पाच हजार रुपये दंड आकारण्याचे ठरविण्यात आले. ट्रक नॅशनल परवाना शुल्क दीड हजार ऐवजी सातशे रुपये तर योग्यता प्रमाणपत्र प्रतिदिन शंभर रुपयांऐवजी प्रत्येक पंधरा दिवसांकरिता शंभर रुपये आकारण्यात येणार आहे. तात्पुरता परवाना शुल्क एक हजाराऐवजी अडीचशे रुपये इतके करण्यात आल्याची माहिती शिव वाहतूक सेनेचे शेख सिकंदर, शेख मुश्ताक, शेख इरफान मास्टर यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)