नाशिक : शेतकऱ्यांना जादा दराने विक्री, आदेशातील त्रुटींची पूर्तता न करणे आदी कारणांमुळे जिल्ह्यातील ७ खत विक्री दुकानांवर कारवाई करण्यात आली असून एकूण ९ परवाने कृषी विभागाने रद्द केले आहेत. यामळे खत विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. खतांच्या सबसिडीत केंद्र शासनाने वाढ केलेली असल्यामुळे डीएपी खत जुन्या दरानेच विक्री करण्याच्या सूचना कृषी विभागाच्या वतीने खत विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही काही खत विक्रेते जादा दराने खतांची विक्री करत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी कृषी विभागाने तालुकास्तरावर भरारी पथकांची निर्मिती केली असून जिल्हास्तर आणि विभागस्तरावरही भरारी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकांकडून जिल्ह्यातील सात दुकानांवर परवाना रद्दची कारवाई करण्यात आली आहे. यात मालेगाव १, देवळा ३, नांदगाव २, आणि सिन्नर तालुक्यातील एका दुकानाचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ७ खत विक्री दुकानांचे परवाने रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 1:11 AM