नाशिक : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रमुख मागणीसह कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेत १ मार्चपासून काम करताना काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा इशारा दिला. राज्यभरातील सुमारे सहा हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार असून, शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास ५ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचे संकेतही प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांनी दिले आहे.या आंदोलनानंतरही शासनाने प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याविषयी ठोस निर्णय घेतला नाही, तर ५ मार्चपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने कृष्णा खोरे, विदर्भ, तापी, कोकण, गोदावरी व मराठवाडा या महामंडळांना विशेष बाब म्हणून वेतन व भत्त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांचीही शासनाने जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या संयुक्त संघर्ष समितीने केली असल्याची माहिती समितीचे पदाधिकारी अजय चौधरी, राजन पवार, विनोद पाटील, विलास बाकशे यांनी दिली. (प्रतिनिधी)
जीवन प्राधिकरण कर्मचारी शासकीय सेवेपासून वंचित
By admin | Published: February 23, 2017 12:12 AM