येवला : समाजात अनेक प्रकारचे अपंग अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. अपंगाबाबत केवळ हळहळ व्यक्त करून भागणार नाही तर त्यांना जाणीवपूर्वक आत्मसन्मान देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी शासन आणि अपंग शाळा चालवित असलेल्या संस्थांनी हातात हात घालून त्यांना आत्मनिर्भर करायला हवे, असे आवाहन महाराष्ट्रातील अपंग संस्थांना नेहमीच मदतीचा हात देणार्या प्रसिद्ध अशा कॅनडा येथील महाराष्ट्र सेवा समिती आॅर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष जीवन कायंदे यांनी केले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मारु तीराव पवार होते. विशेष अतिथी म्हणून संजीव बाफना उपस्थित होते.अपंगांच्या दीपस्तंभ हेलन केलर आणि भारतातील पिहल्या अध्यापिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून कार्यक्र माचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील मुक बधिर मुलांनी सफाईचा संदेश देणारी नाटिका आणिखरा तो एकचि धर्म,तसेच संत तुकाराम महाराजांच्या सुंदर ते ध्यान, उभा विटेवरी या अभंगावर सुंदर नृत्य सादर केले.संस्थेचे अध्यक्ष प्रा.अर्जुन कोकाटे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जीवन कायंदे म्हणाले, आम्ही दूर सातासमुद्रापार असलो तरी महाराष्ट्रात ज्या ठिकाणी असे समाज बदलाचे काम सुरु आहे,त्या सर्व मानवतावादी कार्याची दखल आम्ही नेहमीच घेत आलो आहोत, आम्हीया अशा संस्थांवर, शाळांवर फार उपकार करतो असे नाही तर त्यात आम्हालाही खूप आनंद मिळतो, म्हणून आम्ही हे विशेष काम आनंदाने करतो, या कामातून एक समाधान मिळते ते मिळविणे हा आमचा स्वार्थ आहे. समता प्रतिष्ठानच्या या अपंग पुनर्वसन प्रकल्पाला मी सलाम करतो. भविष्यातही या कामासाठी साथ देत राहू असा विश्वास जीवन कायंदे यांनी यावेळी व्यक्तकेला.कार्यक्र माचे अध्यक्ष माजी आमदार मारु तीराव पवार यांनी यावेळी संस्थेचा हा पसारा एका दिवसात उभा राहिलेला नाही तर त्यासाठी खूप खस्ता खाल्लेल्या समता प्रतिष्ठानच्या पदाधिकारी, शिक्षकांचे मन:पूर्वक कौतुक केले. कार्यक्र मास सिद्धीकायंदे, अमित पटेल,प्रा एस. व्ही निकुंभ, वाजिद शेख, निलेश विसपुते, प्रवीण वाकचौरे, सुधा पाटील,संगीता गुंजाळ, अजय विभांडिक, दिनकर दाणे, अंकुश शिरसाठ, अजीज शेख, शरद श्रीश्रीमाळ, पंडित मढवई, नारायण बारे,सलिल पाटील, कानिफ मढवाई, आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन बाबासाहेब कोकाटे यांनी केले तर सुखदेव आहेर यांनी आभार प्रदर्शन केले.=======फोटो कॅप्शन -शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करताना उपस्थित मान्यवर.( 04येवला जीवन स्कूल)
अपंगांना जाणीवपूर्वक आत्मसन्मान द्या जीवन कांयदे: मायबोली निवासी कर्ण-बधिर विद्यालयाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 5:01 PM
येवला : समाजात अनेक प्रकारचे अपंग अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. अपंगाबाबत केवळ हळहळ व्यक्त करून भागणार नाही तर त्यांना जाणीवपूर्वक आत्मसन्मान देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी शासन आणि अपंग शाळा चालवित असलेल्या संस्थांनी हातात हात घालून त्यांना आत्मनिर्भर करायला हवे, असे आवाहन महाराष्ट्रातील अपंग संस्थांना नेहमीच मदतीचा हात देणार्या प्रसिद्ध अशा कॅनडा येथील महाराष्ट्र सेवा समिती आॅर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष जीवन कायंदे यांनी केले.
ठळक मुद्दे समता प्रतिष्ठान संचिलत मायबोली निवासी कर्ण-बधिर विद्यालयाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून कायंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते,