निफाड : बाभळीच्या झाडावर मांज्याच्या दोऱ्यात अडकलेल्या एका कावळ्याची सुटका करून त्याच्यावर उपचार करत त्यास पुनश्च अवकाशात सोडण्यात आले. येथील पक्षी मित्रमंडळाचे कार्यकर्ते दत्ता उगावकर हे निफाड येथील अकोलखास गल्लीत राहतात. मंगळवारी सकाळी त्यांना त्यांच्या घराच्या मागे असलेल्या बाभळीच्या झाडाला ५० ते ६० फूट उंचीवर झाडावरील मांज्याच्या दोऱ्याच्या विळख्यात कावळा अडकलेला दिसला. त्यांनी वनविभागाला कळविली. त्यानंतर येवला वनविभागाचे वनरक्षकविजय टेकनर व वनकर्मचारी पगारे तातडीने घटनास्थळी आले. दिलीप भगरे हा तरु ण झाडावर चढला व मांज्याच्या दोऱ्याच्या गुंत्यात अडकलेल्या कावळ्यास खाली आणले. सदर कावळा जखमी असल्याने त्यास उपचारासाठी निफाडच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यात आले. तिथे जखमी कावळ्यावर उपचार करून त्यास अवकाशात सोडण्याचे आले. याप्रसंगी वनरक्षक टेकनर, वनकर्मचारी पगारे उपस्थित होते. (वार्ताहर)
कावळ्याला जीवदान
By admin | Published: May 24, 2016 10:32 PM