पेठ -तालुक्यात अतिवृष्टीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले असून राष्ट्रीय व राज्य महामार्गासह लहान मोठया रस्त्यावर मोठया प्रमाणावर दरडी व झाडे कोसळल्याने जवळपास सर्वच तालुका बंदिस्त झाला आहे.२४ तासात तब्बल २४३मिमी पावसाची नोंद झाली असून तालुक्याने पावसाने सरासरी ओलांडली आहे.इनामबरी धरणाच्या खालच्या बाजूला रविवारी अचानक भगदाड पडून पाणी निघू लागल्याने इनामबारी सह करंजाळी, देवगाव व परिसरातील गावांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. आमदार नरहरी झिरवाळ, तहसीलदार हरिष भामरे यांनी तात्काळ भेट देऊन संबंधित विभागाकडून उपाययोजना करत भगदाड दुरु स्ती केल्याने धरण वाचविले.आंबेगण गौतमी -गोदावरी प्रवाही वळण योजनेच्या आंबेगण वळण बंधारा पाण्याचा दाब वाढल्याने खालील शिंदे-हट्टी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सर्व धरणांच्या सांडव्यातून प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या जनतेने सतर्क रहावे असे कळवण्यात आले आहे.प्रमुख रस्ते झाले बंदपेठ तालुका मुख्यालयापासून पेठ -भूवन, पेठ- जांभूळमाळ, पेठ- शिवशेत,पेठ- डेरापाडा,पेठ-लव्हाळी, करंजाळी- हरसुल, जोगमोडी -ननाशी रस्त्यावर दरड व झाडे कोसळल्याने मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. प्रशासनाकडून रस्ते मोकळे करण्याची कार्यवाई सुरू असली तरी पावसाचा जोर कायम असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसामुळे दगड व माती रस्त्यावर आली असून घाटरस्त्यावरून प्रवास करणे धोकेदायक बनले आहे.आसरबारी येथील नदी काठची स्मशानभूमी पुरात वाहून गेल्यामूळे अंत्यविधी साठी नागरिकांना ऐन पावसात कसरत करावी लागत आहे. अभेटी, तिर्ढ, आसरबारी, पेठ, कोहोर, गांगोडबारी, झाडीपाडा, धोंडमाळ यांचेसह गावागावात घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. जामले येथील चिंतामण भोये यांचे शेततळे फुटल्याने सर्व मासे वाहून गेले. माळेगाव, डेरापाडा गावांना जोडणारे फरशी पुल तुटल्याने वाहतूक बंद पडली आहे. धोंडमाळ व जूनोठी येथील पाझरतलाव फुटल्याने शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे
पेठ तालुक्यात जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 3:22 PM
पेठ -तालुक्यात अतिवृष्टीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले असून राष्ट्रीय व राज्य महामार्गासह लहान मोठया रस्त्यावर मोठया प्रमाणावर दरडी व झाडे कोसळल्याने जवळपास सर्वच तालुका बंदिस्त झाला आहे.२४ तासात तब्बल २४३मिमी पावसाची नोंद झाली असून तालुक्याने पावसाने सरासरी ओलांडली आहे.
ठळक मुद्देरस्ते बंद-दरडीसह झाडे कोसळल्याने गावांचासंपर्क तुटला, पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान