सिन्नर तालुक्यातील तामकरवाडी येथे ११ ऑक्टोबर २०१६ साली आरोपी कैलास लक्ष्मण चव्हाण (२८) याने त्याची पत्नी शोभा हिच्या चारित्र्यावर संशय घेत रात्रीच्या सुमारास मारहाण करत अंगावर रॉकेल ओतून जिवंत पेटवून दिले होते. यामुळे शोभा मोठ्या प्रमाणात भाजल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आरोपी पती यास पोलिसांनी अटक करून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. टी. पांडे यांच्या न्यायालयात या खटल्यावर अंतिम सुनावणी पार पडली. न्यायालयाने चव्हाण यास खुनाच्या गुन्ह्यात दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे ॲड. योगेश कापसे यांनी युक्तिवाद करीत दहा साक्षीदार तपासले. त्यानुसार परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी चव्हाण यास जन्मठेप दिली.
पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 4:24 AM