चांदोरी : पोळा, गणेशोत्सव, गौरी गणपती, दसरा, संक्र ातपासून ते दिवाळी पर्यन्त या सर्व सणामध्ये आपल्या कला कुसरीनें कुंभार बांधव रंग भरीत असतात.कुठलाही सण पुढील एक ते दोन मिहने राहिला की कुंभार वाड्यात अनेक हात त्या सणासाठी राबायला लागतात.घरातील लेकरांपासून ते अगदी म्हातार्यापर्यंत सर्वज जण आपापल्या परीने या सणउत्सवासाठी मेहनत घेत असतात.पण आपल्या कला कुसरीने प्रत्येक सणात रंग भरणार्या कुंभार बांधवांचे जगणे बेरंग झाल्याची प्रतिक्रि या आता अनेक कुंभार बांधव करत आहे.सध्या पोळ्याचा सण तीन आठवड्यावर येऊन ठेपला आहे.या सणउत्सवात आनंद भरण्यासाठी निफाड तालुक्यातील अनेक कुंभार बांधवांचे हात मागील मिहन्या पासून राबायला सुरवात झाली आहे.माती असो की प्लास्टर आॅफ पॅरिस असो सर्वच काम अगदी मेहनतीचे आहेत.मातीचे सुंदर बैल किंवा गौरीचे मुखवटे बनवताना बारकाईने कलाकुसर करावी लागते.मात्र मेहनतीच्य मानाने विक्र ी नंतर मोबदला मिळत नसल्याच्या भावना अनेककानी बोलून दाखिवल्या.शिवाय या व्यवसायाला कुठलीही शासकिय मदत अथवा विमा नसल्याने मोठी दगदग करून अनेकदा नुकसानही सोसावी लागते.बारा बलुतेदारांचे अनेक व्यवस्था मोडीत निघाले असताना आजही तग धरून उभे असलेल्या या व्यवसायाला शासन स्तरावरून हातभाराची गरज आहे.कुंभार व्यवसायात रात्र दिवस राबावे लागते या उपरही पाहिजे तितका मोबदला मिळत नाही. शासन स्त्रावररून याबाबत चर्चा व्हावी कुंभार बांधवांना हातभार द्यावा.- तुषार गारे, युवक सचिव, अखिल भारतीय कुंभार विकास संस्था.
नागरिकांच्या सणोत्सवात रंग भरणार्या कुंभाराचे जगणे बेरंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 6:36 PM
चांदोरी : पोळा, गणेशोत्सव, गौरी गणपती, दसरा, संक्र ातपासून ते दिवाळी पर्यन्त या सर्व सणामध्ये आपल्या कला कुसरीनें कुंभार बांधव रंग भरीत असतात.कुठलाही सण पुढील एक ते दोन मिहने राहिला की कुंभार वाड्यात अनेक हात त्या सणासाठी राबायला लागतात.
ठळक मुद्दे पोळ्याचा सण तीन आठवड्यावर येऊन ठेपला आहे.