नाशिक : येथील अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नाशिक येथे नुकतीच उत्तर महाराष्ट्रातील पहिलीच टिप्स शस्त्रक्रिया करून लिव्हर सिरोसिसच्या रुग्णाला जीवदान देण्यात आले. लिव्हर सिरोसिस होऊन वाहिन्यांवर झालेल्या उच्चरक्तदाबाच्या गंभीर परिणामांवर मध्यरात्रीपासून तातडीने शस्त्रक्रिया रुग्णाचा जीव वाचविण्यात यश आल्याचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. तुषार संकलेचा यांनी सांगितले.
यकृतामध्ये सामान्यत: पोट, अन्ननलिका किंवा आतडे यातील रक्तवाहिन्यांतून होणारा रक्तस्त्रावही यामुळे आटोक्यात आणता येतो. टीआयपीएस अर्थात टिप्स ही एक अत्यंत कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया आहे. तज्ज्ञ डॉक्टर रुग्णास लिव्हर सिरोसिस होऊन रक्ताची उलटी होणे, एन्डोस्कोपी करूनही रक्ताची उलटी न थांबणे आणि सतत पोटात पाणी होणे यासारख्या गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरतात.
डॉ. तुषार संकलेचा यांनी टीआयपीएस करण्यात आलेल्या रुग्णाला लिव्हर सिरोसिस झाल्याने तातडीचा उपाय म्हणून ही शस्त्रक्रिया करावी लागल्याचे सांगितले. रुग्णास रक्ताच्या उलट्या होत होत्या, एन्डोस्कोपी करूनही रक्त वाहिन्यांवरील दबाव कमी होत नव्हता परंतु टिप्स शास्त्रक्रियेनंतर अंतर्गत रक्तप्रवाह बंद होऊन रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. या अतिशय क्लिष्ट शस्त्रक्रियेत डॉ. अमोल भालेकर आणि डॉ. तुषार संकलेचा यांच्यासह कॅथलॅब टेक्निशियन टीम, आयसीयू टीम, अनास्थेशिया टीम आणि तज्ज्ञ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मुखतः लिव्हर सोरायसिसच्या रुग्णास रक्तस्त्रावाचा धोका जास्त असतो. रक्तवाहिनीला यकृतात काही इजा होणे, नसांवर दबाव येणे, यकृताला हानी पोहोचणे किंवा लिव्हर सिरॉसिसमुळे पोटात पाणी होणे, अशा अनेक त्रासांवर टीआयपीएसचा उपयोग होतो, असे डॉ. संकलेचा यांनी नमूद केले. केंद्रप्रमुख रितेश कुमार यांनी रुग्णालयाविषयी दिलेल्या माहितीत सांगितले की, अनुभवी तज्ज्ञ आणि रुग्णालय सुविधा यांची योग्य सांगड असल्याने अशा शस्त्रक्रिया करणे रुग्ण आणि डॉक्टर्स यांना सोयीचे असते.