पाथरे : सिन्नर तालुक्यातील शहा येथील भैरवनाथ हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालय येथे जीवन कौशल्य प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील किशोरवयीन मुलांसाठी व मुलींसाठी, जीवन कौशल्य या विषयाशी निगडीत पाचदिवसीय मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात संवाद कोशल्य, लिंगभाव, शारीरिक साक्षरता, स्त्री आणि पुरुष प्रजनन अवयव, स्वविकास, शारीरिक व मानसिक बदल, गर्भनिरोधक साधने, व्यसन, गुंडगिरी, समवयीन दबाव, लैंगिक शोषण, करिअर मार्गदर्शन या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सी. वाय. डी. ए., पुणे संस्थेचे प्रशिक्षक प्रीतेश संजीवनी चंद्रमनी, सरिता अनिता अरुण, कौस्तुभ विजया प्रमोद, संघटक भाऊसाहेब शेळके यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी शहाच्या ग्रामसेविका शबाना शेख, प्राचार्य सुनील गडाख तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
----------------------
प्रशिक्षणात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी शबाना शेख, प्राचार्य सुनील गडाख तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सहभागी विद्यार्थी उपस्थित होते. (२३ शहा)
===Photopath===
230121\23nsk_10_23012021_13.jpg
===Caption===
२३ शहा