पेठ : पेठ व सुरगाणा तालुक्याला जोडणाºया नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात रहिवाशांसह प्रवाशांना जीव धोक्यात घालून पूरपाण्यातून प्रवास करावा लागत आहे. नदीवर पूल उभारण्याची मागणी वाहनधारकांसह रहिवाशांनी केली आहे.शेपुझरी देवस्थान पेठ, सुरगाणा, दिंडोरीसह गुजरात राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असून, याच तीर्थक्षेत्राजवळून पार नदी वाहते. सुरगाणा तालुक्यात उगम पावणाºया या नदीला मोठा पूर येतो. महाशिवरात्री व आषाढी एकादशीला शेपुझरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.पावसाळ्यात नदीला आलेल्या पुरामुळे शेपुझरी व इतर गावांचा संपर्कतुटतो. परिसरातील अंबास, कहांडोळपाडा, वडपाडा, गांडोळे आदी गावांना पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करून नदी पार करावी लागते. शेपुझरी गावाजवळील पार नदी सुरगाणा व पेठ तालुक्यातून वाहणारी पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी आहे.
पावसाळ्यात नदीला प्रचंड पूर येत असल्याने येथील अनेक गावांचा संपर्कतुटतो. पूल उभारण्याची मागणी करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून या भागातील जनतेला पावसाळ्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पार नदीवर पूल नसल्याने शेपुझरी तीर्थक्षेत्राचा विकास खुंटला असून, या ठिकाणी पूल झाल्यास पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांना गुजरात राज्यात प्रवासासाठी व मालवाहतूक करण्यासाठी जवळचा मार्ग होऊ शकतो. तसेच पुराच्या पाण्यातून करावा लागणारा जीवघेणा प्रवास थांबण्यास मदत होईल.- शरद पवार, वाहनधारक