त्र्यंबकेश्वर : येथील मंदिर उघडल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. तथापि मंदिरात नारळ, फुले, दूध, अंगारा आदी वस्तू घेऊन जाण्यास बंदी असल्याने फुले, नारळ विक्रेत्यांचे व्यवसाय अद्याप बंदच असल्याने ते व्यावसायिक मात्र अजूनही ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.कस्तुरी माळा, शंख विक्रेते, हातगाडीवर छोटेमोठे व्यवसाय करणारे, गायीसाठी चारा विकणाऱ्या महिला, हॉटेल्स आदी व्यवसाय सुरू झाले असले तरी अद्याप म्हणावी अशी गर्दी यात्रेकरू येत नसल्याने व्यवसाय कमीच आहेत. याशिवाय अजून धार्मिक विधी बंदच आहेत.देवस्थान तर्फेही जाहीर करण्यात आले आहे की, दिवसभरात फक्त एक हजार भाविकांनाच दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. शिवाय अद्याप कोरोनाचा कहर सुरूच असल्याने शासकीय नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. परिणामी सध्यातरी भाविकांची म्हणावी तशी गर्दी होत नाही.
त्र्यंबकेश्वर येथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:15 PM