नाशिकरोड : कौटुंबिक नैराश्यातून एका ज्येष्ठ नागरिकाने कचराकुंडीत उभे राहून स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.१७) सकाळी ९ वाजेच्या सुमारास मनपा शाळा क्रमांक ५७च्या मैदानाशेजारील एसटी महामंडळाच्या जागेवर घडली.गायकवाड मळ्यातील रहिवासी त्र्यंबक नामदेव लोहकरे (वय ६५) यांनी दत्तमंदिररोड भागातील आनंदनगर रस्त्यावरील एसटी महामंडळाच्या मोकळ्या भूखंडातील कचराकुंडीवर उभे राहून अंगावर ज्वलंतशील पदार्थ टाकून स्वत:ला पेटवून घेतले. प्रत्यक्षदर्शींनी हा सर्व बर्निंग थरार बघताच पाणी टाकून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना अपयश आले.सिन्नर तालुक्यातील मूळ नायगावचे असलेले त्र्यंबक लोहकरे यांनी स्वत:च कचराकुंडीत स्वत:ला पेटवून घेतले. लोहकरे यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांसह नगरसेवक रमेश धोंगडे आदींच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटली. लोहकरे यांची पत्नी सुशीला लोहकरे, मुलगी मोनिका बनकर घटनास्थळी आल्यानंतर घटनेचा उलगडा झाला. लोहकरे रिक्षाचालक होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता. तेव्हापासून ते नैराश्यग्रस्त होते. याच नैराश्यातून रविवारी सकाळी त्यांनी एसटी महामंडळाच्या जागेवर येऊन तेथे साचलेला कचऱ्यावर उभे राहून स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
कचराकुंडीचेच सरण करून वृद्धाने संपविले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 1:56 AM
कौटुंबिक नैराश्यातून एका ज्येष्ठ नागरिकाने कचराकुंडीत उभे राहून स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.१७) सकाळी ९ वाजेच्या सुमारास मनपा शाळा क्रमांक ५७च्या मैदानाशेजारील एसटी महामंडळाच्या जागेवर घडली.
ठळक मुद्देआत्महत्या : ज्वलंतशील पदार्थ अंगावर टाकून स्वत:ला पेटवले