नाशिक : आपल्या सहज, सोप्या, साध्या बोलीभाषेत जगण्याचे सार सांगणाऱ्या कवयित्री म्हणून बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा जागर सोमवारी (दि. २५) नाशकात झाला आणि प्रत्येकाला आपल्याच आयुष्याचे बोलके चित्रण समोर उभे राहिल्याचा भास झाला.विकास अणि अनुराधा गरुड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंजूषा सोमण यांचे ओघवत निवेदन आणि गीता गद्रे यांनी स्वरबद्ध केलेल्या या कविता ऐकताना उपस्थित भारावून गेले. अक्षरांशी ओळख नसल्याने त्यांना निरक्षर म्हणणे योग्य आहे मात्र अशिक्षित म्हणणे अयोग्य असल्याचा विचार मंजूषा सोमण यांनी मांडला. बहिणाबार्इंच्या कविता वºहाडी-खान्देशीत, त्यांच्या मातृबोलीत रचलेल्या आहेत. त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार, शेतीची साधने, कापणी, मळणी असे रोजच्या जीवनातील आहे. गीता गद्रे यांनी सादर केलेल्या रचनांतून शेती, सणवार आदी प्रसंग डोळ्यासमोर अक्षरश: उभे राहिले. निवेदनाच्या रूपातून बहिणाबार्इंचे आयुष्य उलगडत होते. गीता गद्रे यांनी याच स्वरबद्ध केलेल्या शब्दांना रसिकांनी उस्फूर्त दाद दिली. तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुख-दु:खाकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान हा बहिणाबार्इंच्या रचनेचा नेमका बाज मंजूषा सोमण आणि गीता गद्रे यांनी सांभाळला.
बहिणाबार्इंच्या रचनेतून आयुष्याचे बोलके चित्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:40 AM