शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

३५० अंध थेरपिस्टला हवा आधाराचा उजेड

By संजय वाघ | Published: September 08, 2018 1:22 AM

जन्मजात अंधत्व वाट्याला येऊनही त्याबद्दल कुढत न बसता अनेक दृष्टीबाधितांनी आपल्या ज्ञानाच्या अंतश्चक्षूंच्या साहाय्याने डोळसांना लाजविणारे काम उभे केले आहे. आजही देशभरातील ३५० दिव्यांग फिजिओथेरपिस्ट निसर्गोपचार थेरपीच्या माध्यमातून रुग्णांची सेवा बजावित असून, सामाजिक आधाराच्या प्रकाशापासून ते आजही वंचित आहेत.

ठळक मुद्देजागतिक फिजिओथेरपी दिन कौन्सिल बनवून रजिस्ट्रेशन करण्याची मागणी केंद्राकडे प्रलंबित

नाशिक : जन्मजात अंधत्व वाट्याला येऊनही त्याबद्दल कुढत न बसता अनेक दृष्टीबाधितांनी आपल्या ज्ञानाच्या अंतश्चक्षूंच्या साहाय्याने डोळसांना लाजविणारे काम उभे केले आहे. आजही देशभरातील ३५० दिव्यांग फिजिओथेरपिस्ट निसर्गोपचार थेरपीच्या माध्यमातून रुग्णांची सेवा बजावित असून, सामाजिक आधाराच्या प्रकाशापासून ते आजही वंचित आहेत.धकाधकीच्या आयुष्यामुळे जीवनशैली बदलल्याने हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब व अपंगत्व आदी नानाविध विकारांनी मनुष्य त्रस्त आहेत. त्या आजारांवर मात करण्यासाठी आधुनिक उपचार पद्धती विकसित होत असताना फिजिओथेरपी पद्धतीनेही रुग्णांना आधार दिला आहे. अंध थेरपिस्ट बालपणापासून ब्रेललिपीतून शिक्षण घेतात, त्यांना उत्तम स्पर्शज्ञान असते. रुग्णांच्या सांध्याची हालचाल व स्नायू पकडून त्यावर उपचार करण्यासाठी या स्पर्शज्ञानाचा त्यांना लाभ होतो.फिजिओथेरपिस्टसंदर्भात देशात तीन संस्था कार्यरत असून, त्यात अहमदाबाद येथील ब्लाइंड पीपल्स असोसिएशन, नवरंगपुरा फिजिओथेरपी आणि मुंबईतील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थांचा समावेश आहे. आज देशात ३५० दृष्टिबाधित थेरपिस्ट सेवा बजावित असून, त्यातील केवळ ३१ जण पदवीधर आहेत. त्यांना वैद्यकीय सेवा बजावताना विविध अडचणींना सामारे जावे लागते. ती अडचण दूर व्हावी यासाठी केंद्र शासनाने कौन्सिल बनवून त्यांचेही रजिस्ट्रेशन करून घ्यावे यासाठी त्यांचा लढा गेल्या दहा वर्षांपासून सुरू असून, अद्याप त्यात यश आलेले नाही.फिजिओथेरपींसंदर्भात समाजात जागृती व्हावी व त्यांनाही मान्यता मिळावी यासाठी साजऱ्या केल्या जाणाºया जागतिक फिजिओथेरपी दिनाच्या अनुषंगाने शासन व समाजाने या घटकाला आधार द्यावा, अशी मागणी पुढे आली आहे.

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिक