नाशिक- चक्रीवादळाचा परिणाम म्हणून दुपारपासून शहरात जोरदार वारे वाहु लागले आणि त्यानंतर दुपारी हलकासा पाऊस झाला मात्र काही क्षणातच ऊन पडले आहे.
यापूर्वी निसर्ग वादळाचा मोठा फटका नाशिक जिल्ह्यालाही बसला होता त्या पार्श्वभूमीवर यंदा अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळामुळे जिल्हा प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला होता नागरिकांनी विजा कडाडत असताना घराबाहेर पडू नये तसेच मुसळधार पाऊस असतानाही बाहेर जाऊ नये, विजेच्या खांबाजवळ थांबू नये, पाऊस सुरू असताना विद्युत उपकरणे आणि मोबाईल पासून दूर राहावे अशा अनेक सूचना जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केल्या होत्या इतकेच नव्हे तर आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज ठेवण्यात आला असून नागरिकांना काही मदत लागल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन देण्यात करण्यात आले आहे आज सकाळपासून शहरात काहीसे ढगाळ …