नाशिक : परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला असून, शनिवारी दिंडोरी आणि इगतपुरी येथे झालेल्या वेगवेगळ्या घटनेत वीज कोसळून जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू झाला.दिंडोरी तालुक्याला पुन्हा झोडपून काढले आहे. शनिवारी श्रीरामनगर येथे अंगावर वीज पडून यमुनाबाई निवृत्ती गांगुर्डे ठार झाल्या. गांडोळे येथील घटनेत सुनीता भोये गंभीर जखमी झाल्या आहेत.इगतपुरी तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. दुपारी ३ वाजेच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. हिराबाई कारभारी सदगीर (४७) रा. तळेगाव बुद्रुक या शेतात गुरे चारण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्या जागीच ठार झाल्या. याबाबत त्यांचे पती कारभारी सदगीर यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुसऱ्या घटनेत भरत भाऊराव भले (४०) रा. बारशिंगवे यांच्याही अंगावर वीज पडल्याने ते ठार झाले. परतीच्या पावसाने तालुक्यात सलग दोन दिवस वादळी वाºयासह हजेरी लावली. पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वीज कोसळून जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 12:39 AM
नाशिक : परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला असून, शनिवारी दिंडोरी आणि इगतपुरी येथे झालेल्या वेगवेगळ्या घटनेत वीज कोसळून जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू झाला.
ठळक मुद्देजखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले