रविवारी सकाळपासून वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळनंतर ढगाळ वातावरण झाल्याने पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तालुक्यात रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसापेक्षा विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होता. तालुक्याच्या पूर्व भागातील वावी येथे विलास शंकर सच्चे यांच्या घरावर वीज कोसळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सच्चे कुटुंबीय घरातच होते. अचानक विजांचा कडकडाट व मोठा आवाज होऊन वीज घरावर कोसळली. यामुळे घराचे सर्व पत्रे फुटण्यासह घरातील सर्व इलेक्ट्रिक वस्तू जळून खाक झाल्या. फ्रीज, टीव्ही, वायरिंग जळाली. कुटुंबीयांचे डोळे दीपून गेले. तसेच अनेक संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. घराशेजारील चिंचेचे झाड काही प्रमाणात जळाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
फोटो ओळी: सिन्नर तालुक्यातील वावी येथे विलास सच्चे यांच्या घरावर वीज कोसळून झालेले नुकसान.