नाशिक : लायन्स क्लब नाशिक पंचवटीच्या वतीने कोरोना डॉक्टर्स डेनिमित्त कोरोना योद्धांना सन्मानित करण्यात आले. मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलच्या डॉक्टरांसह कर्मचारी वर्गदेखील तितक्याच धिरोदात्तपणे कार्य करून त्यांचे कर्तव्य पार पाडत असल्याबद्दल डीन डॉ. मृणाल पाटील यांच्यासह सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना लायन्सच्या वतीने गौरविण्यात आले. गत १६ वर्षे डॉक्टर्स डेनिमित्त विविध क्षेत्रांतील कार्य करणा-या डॉक्टरांचा सन्मान केला जातो. यंदाच्या वर्षी कोरोनामध्ये बहुतांश डॉक्टर अव्याहतपणे कार्य करीत आहेत. निश्चित व नेमके नियोजन, रु ग्णांची काळजी, कोविडबाधित रु ग्णांसाठी विशेष संवाद करण्यासाठी यंत्रणा, त्यांच्यासाठी विशेष डॉक्टरांची टीम कार्यरत असणे अशा विविध रु ग्णहिताच्या सोयी डीन डॉ. मृणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत. आजपर्यंत ४००हून अधिक कोविड बाधित रु ग्णांची काळजी घेतली आहे. त्याबद्दल डॉ. मृणाल पाटील व त्यांच्या टीमचा सत्कार करून कौतुक करण्यात आले. डॉ. मृणाल पाटील यांच्यासह रु ग्णालयातील प्रत्येक विभागाच्या एका व्यक्तीचा सन्मान प्रशस्तिपत्रक व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. डॉक्टर, नर्सेस यांच्यासह वॉर्डबॉयपासून रु ग्णवाहिकाचालक, सफाई कामगार, रु ग्णालय व्यवस्थापक यांचा सत्कार कोविडच्या नियमानुसार करण्यात आला. क्लबचे अध्यक्ष सुनील देशपांडे, माजी प्रांतपाल वैद्य विक्र ांत जाधव, सुजाता कोहोक, विभागीय अध्यक्ष रितू चौधरी, माजी अध्यक्ष अरु ण अमृतकर, रमेश चोटालिया आणि यांच्या हस्ते करण्यात आला. माजी प्रांतपाल वैद्य विक्र ांत जाधव यांनी डॉक्टरांवरील विश्वास कोविडच्या काळात दृढ झाल्याचे सांगितले.
लायन्स क्लब पंचवटीतर्फे मविप्रच्या डॉक्टरांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 6:58 PM