व्यासपीठावर झोन चेअरमन सुनील पाटील, जिल्हा समन्वयक राजेश कोठावदे, सचिव नंदिकशोर नि-हाळी, खजिनदार संतोष दातरंगे, माजी अध्यक्ष सर्जेराव देशमुख, विलास गोसावी, किशोर लहामगे उपस्थित होते. नूतन अध्यक्ष डॉ. डॉ. प्राणेश सानप यांच्यासह पदाधिकाऱ्यांना त्यांनी पदाची शपथ दिली. प्रत्येक पदाधिका-यास त्याच्या पदाची जबाबदारी सांगून ती सक्षमपणे पेलण्याचे आवाहन केले. तसेच जिल्हा समन्वयक राजेश कोठावदे यांनी नूतन सदस्यांना शपथ दिली. शहरातील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी बसस्थानक परिसरात प्रदूषण नियंत्रण युनिट बसविण्यात येणार आहे. तसेच एका गरजू विद्यार्थ्यांस पदवीपर्यंत शिक्षणासाठी दत्तक घेतले जाईल याशिवाय विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष डॉ. सानप यांनी दिली. लायन्स क्लब आॅफ सिन्नर युनिटीने स्थापनेनंतर अल्पावधीत विविध सामाजिक उपक्र म राबवून प्रशंसनीय कार्य केल्याचे उपप्रांतपाल अभय शास्त्री यांनी सांगितले. लायन्स क्लब आॅफ युनिटीचे संस्थापक कांतीभाई पटेल, दया पटेल, डॉ. हेमांगी सानप यांनी सूत्रसंचालन तर सचिव नंदकिशोर निºहाळी यांनी आभार मानले. यावेळी लायन्सचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
लायन्स क्लब सिन्नर युनिटीचा पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 5:48 PM