नाशिक : आंबा खाल्ल्याने दीडशे जणांना अपत्य प्राप्ती झाली, विशेषत: मुले झाली या संभाजी भिडे यांच्या कथित उद््गारानंतर महपाालिकेने त्यांच्याकडून अशाप्रकारच्या कुटुंबांची नाव-पत्त्यासहित यादी मागितली आहे.महापालिकेच्या नोटिसीला अद्याप भिडे यांच्याकडून उत्तर मिळालेले नाही. शिवप्रतिष्ठानचे संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये १० जून रोजी घेतलेल्या मेळाव्यात कथित वादग्रस्त विधान केले होते. त्यात आपल्या शेतातील आंबे १८० जणांना दिले. त्यातील १५० जणांना मुले झाल्याचा दावा केला होता. यासंदर्भातील तक्रारीनंतर आरोग्य सहसंचालकांच्या आदेशानुसार नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने भिडे यांना नोटीस बजावली आहे, त्यात भिडे यांनी उल्लेख केलेली आंब्याची झाडे किती आणि कुठे आहेत, याबाबत सविस्तर खुलावा करण्यास सांगितले असून, त्याचबरोबर ज्या दाम्पत्यांना आंबा दिल्याने मुलगा झाला अशा सर्व दाम्पत्याचे नाव आणि पत्त्यानिशी माहिती आपल्या खुलाशात नमूद करण्यास सांगण्यात आले आहे.महापालिकेने १८ जून रोजी नोटीस बजावली आहे. परंतु अद्याप त्याला उत्तर मिळाले नसून आता मुदत संपल्याने महापालिका काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे.
आंब्याने अपत्यप्राप्ती, नाशिक पालिकेने भिडेंकडे मागितली दाम्पत्यांची यादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 3:13 AM