नाशिक : शेतक-यांना कर्जमाफीच्या प्रश्नांवरून विरोधकांकडून सातत्याने सत्ताधा-यांना धारेवर धरले जात असल्याच्या पार्श्वभुमीवर नाशिक जिल्ह्यातील आणखी ५५ हजार कर्जदार शेतक-यांची ग्रीन यादी राज्य सरकारने जाहीर केली असून, जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून या यादीची युद्धपातळीवर छाननी केली जात आहे, त्यासाठी शनिवार व रविवार अशा दोन्ही दिवस बॅँकेच्या आठशे कर्मचा-यांमार्फत दोनशे शाखांमध्ये रात्रंदिवस काम सुरू आहे.राज्य सरकारने जुन महिन्यात कर्जदार शेतक-यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वाभीमान योजना जाहीर केली असली तरी, प्रत्यक्षात शेतक-याच्या बॅँक खात्यात कर्जाची रक्कम अद्यापही पडू शकलेली नाही. आॅक्टोंबर महिन्यात शासनाने कर्जमाफीस पात्र ठरणाºया शेतक-यांच्या याद्या जाहीर करण्यास सुरूवात केली. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील ८७९ शेतकºयांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीच्या आधारे त्या त्या बॅँकेच्या शाखेत याद्यांची तपासणी करण्यात आली. त्यात प्रामुख्याने कर्जदार शेतक-याने भरलेल्या माहितीची पडताळणी करण्यात आली आहे. या शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. तथापि, शासनाने दिलेली नोव्हेंबर अखेरची मुदत टळून गेल्याने आता ११ डिसेंबरपासून सुरू होणा-या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याच प्रश्नावरून विरोधकांकडून सत्ताधारी पक्षााला धारेवर धरण्याचे तसेच संपुर्ण कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत अधिवेशन न चालू देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने शेतकरी कर्जमाफी प्रकरणाला अधिक प्राधान्य दिले. दोन दिवसांपुर्वीच नाशिक जिल्ह्यातील सुमारे ५५ हजार शेतक-यांची ग्रीन यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी जिल्हा बॅँकेला प्राप्त झाली आहे. या यादीची बॅँक शाखा पातळीवर छाननी करून २४५ कोटी निधीसाठी तसा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शासनाला अधिवेशनापुर्वी शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी करायची असल्याकारणाने सहकार विभागाने जिल्हा बॅँकेला अहोरात्र काम करून कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांची संख्या वाढवायची आहे. त्यामुळे अगोदरच दिवस-रात्र काम करणा-या जिल्हा बॅँकेच्या कर्मचा-यांची शनिवार व रविवारची शासकीय सुटी रद्द करण्यात आली आहे.शनिवारी जिल्हा बॅँकेच्या जिल्ह्यातील दोनशे शाखांमध्ये फक्त शेतकरी कर्जमाफीचे काम करण्यात आले. शाखा पातळीवर आलेल्या पात्र शेतक-यांची यादी शाखा व्यवस्थापक, सोसायटी सचिव, लेखा परिक्षक व बॅँकेचे संबंधित कर्मचा-यांमार्फत या याद्यांची छाननी करण्यात आली. रविवारी देखील सर्वच शाखा सुरू राहतील असे बॅँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील ५५ हजार शेतक-यांची कर्जमाफी यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 2:56 PM
राज्य सरकारने जुन महिन्यात कर्जदार शेतक-यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वाभीमान योजना जाहीर केली असली तरी, प्रत्यक्षात शेतक-याच्या बॅँक खात्यात कर्जाची रक्कम अद्यापही पडू शकलेली नाही. आॅक्टोंबर महिन्यात शासनाने कर्जमाफीस पात्र ठरणाºया शेतक-यांच्या याद्या जाहीर करण्यास सुरूवात केली.
ठळक मुद्देसुटीच्या दिवशीही बॅँका सुरू : युद्धपातळीवर याद्यांची छाननीयादीची बॅँक शाखा पातळीवर छाननी करून २४५ कोटी निधीसाठी तसा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्याच्या सुचना