नाशिक : कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदी केली असली तरी, त्याचा बाजारभावावर विशेष परिणाम जाणवणार नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता टप्याटप्याने कांदा विक्रीसाठी बाजारात आणावा, असे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी आणि काही व्यापाºयांनी व्यक्त केले आहे.मागील काही दिवसांपासून देशभरात कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने तब्बल चार वर्षांनंतर कांदा उत्पादकांना कांद्यापासून बºयापैकी आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे. घाऊक बाजारात दर वाढल्याने किरकोळ बाजारातही कांद्याने उच्चांकी दर गाठला आहे. परिणामी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असली तरी, केंद्र शासनाचा हा निर्णय म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणण्याचा प्रकार असल्याचे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दर वाढल्याने केंद्र शासनाने प्रथम कांदा निर्यात किमान मूल्य वाढविले, मात्र तरीही दर कमी झाले नाहीत. यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. परिणामी कांद्याची मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने नैसर्गिकरीत्या कांद्याच्या दरात वाढ झाली आहे, असे मत सह्याद्री फार्मस् प्रोड्युस कंपनीचे संचालक विलास शिंदे यांनी व्यक्त केले. सध्या स्थानिक बाजारातच मागणी अधिक आहे.दक्षिणेकडील राज्यांमधील कांदा अद्याप बाजारात आलेला नाही. त्याचबरोबर किमान निर्यातमूल्यही वाढलेले असल्याने कांद्याची निर्यात तशीही एक-दोन टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन फारसे काही साध्य होईल असे दिसत नाही. या निर्णयामुळे केवळ दबाव टाकण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यातून कांदा उत्पादकांबरोबरच आपल्या निर्यातीचेही नुकसान होणार आहे. नवीन कांदा बाजारात येण्यासाठी अद्याप महिनाभराचा अवधी आहे.निर्यात बंदी केल्याने लगेचच कांद्याचे दर खाली येतील असे होणार नाही. त्यामुळे शेतकºयांनी घाबरून न जाता आपल्याकडील कांदा टप्याटप्याने बाजारात विक्रीसाठी आणावा, असा सल्ला विलास शिंदे यांनी दिला आहे.शेतकºयांकडेही लक्ष द्यावेसध्या बाजारात नवीन कांदा आलेला नाही. जो कांदा देशात उपलब्ध आहे तो आपल्या देशातील नागरिकांना पुरवता यावा या हेतूने केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. शहरी भागातील ग्राहकांकडे लक्ष देताना शेतकºयांचे नुकसान होणार नाही, याकडेही शासनाने लक्ष द्यायला हवे. सध्या देशातून होणारी कांद्याची निर्यात नगण्य आहे. मात्र या निर्णयाचा नागरिकांवर मानसिक परिणाम होऊ शकेल, असे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका कांदा व्यापाºयाने सांगितले.
श्ोतकऱ्यांनो, घाबरून जाऊ नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 1:04 AM