नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तन चळवळीची बिजे महात्मा फुले यांच्या साहित्यातच रोवली गेली आहेत, असे प्रतिपादन प्रा.जी.आर मोरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील माजी विद्यार्थी मित्र परिवाराच्यावतीने महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन प्रवर्तन व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ. जी.आर मोरे यांनी महात्मा फुले साहित्य आणि विचार या विषयावर गुंफले. आपल्या व्याख्यानात डॉ. मोरे यांनी ज्योतिराव फुले यांनी पुराण आणि परंपरा यामध्ये न अडकता त्यातील इतिहास शोधून काढला, असे मत व्यक्त केले. महात्मा फुले यांनी लिहिलेले नाटक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसुड आदी सर्व साहित्याचा आढावा घेत त्यातून क्रांतीची बिजे कशी रोवली गेली व समाज परिवर्तन कसे झाले याचे विवेचन केले. ऑनलाइन झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गणेश सूर्यवंशी यांनी केले तर आभार धनंजय पवार यांनी मानले. कार्यक्रमात राज्यभरातील माजी विद्यार्थी ऑनलाइनच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
आंबेडकर चळवळीची बिजे फुले यांच्या साहित्यात: जी.आर. मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 1:28 AM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तन चळवळीची बिजे महात्मा फुले यांच्या साहित्यातच रोवली गेली आहेत, असे प्रतिपादन प्रा.जी.आर मोरे यांनी केले.
ठळक मुद्देप्रवर्तन व्याख्यानमालेत प्रतिपादन