राज्य परिवहन महामंडळाने १ ते १५ डिसेंबर या कालावधीत बसस्थानक आणि स्थानकाच्या आवारातील स्वच्छता मोहीम राबविली. याबरोबरच चालक-वाहक विश्रांती आणि स्वागत कक्षाबरोबरच स्वच्छतागृहांची स्वच्छता या कालावधीत करण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ स्थानकामध्ये करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात स्वच्छता होतानाचे चित्र अभावानेच दिसले. रोजच प्रवाशांची ये-जा असल्यामुळे दैनंदिन स्वच्छता महत्त्वाची ठरते. त्यातच कोरोनाचा प्रभाव आणि आता नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमुळे सतर्कता तितकीच महत्त्वाची आहे.
शहरात ठक्कर बझार, महामार्ग, जुने सीबीएस, निमाणी, नाशिक रोड ही महत्त्वाची बसस्थानके आहेत. जिल्ह्यात एकूण १३ ठिकाणी महत्त्वाची बसस्थानके आहेत. शहरातील स्थानकांवर प्रवाशांची होणारी गर्दी जिल्ह्यातील अन्य स्थानकांवर होत नसली, तरी अस्वच्छतेच्या बाबतीत जिल्ह्यातील स्थानकेदेखील अस्वच्छतेच्या गर्तेत आहे.
बसस्थानकांवरील अस्वच्छता अत्यंत गंभीर विषय आहे. आवारात पडलेल्या रिकाम्या बाटल्या, गुटख्यांच्या पुड्या तसेच खाद्यपदार्थांचे रॅपर यामुळे संपूर्ण स्थानक परिसरात अस्वच्छता निर्माण होते. स्वच्छता करण्यासाठी ठेका देण्यात आलेला होता, तेव्हाही तक्रारी होत्या आणि ठेकेदार रद्द झाल्यानंतरदेखील अस्वच्छतेच्या तक्रारी आहेत. महामंडळाचे स्वच्छता कर्मचारी स्वच्छतेचे कामकाज करीत असले, तरी स्थानकांचे आवार आणि कर्मचाऱ्यांची संख्या पाहता स्थानकांवरील स्वच्छता हा प्रश्न नेहमीच उपस्थित होत राहणार आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
राज्य परिवहन महामंडळाने १ ते १५ डिसेंबर या कालावधीत बसस्थानक आणि स्थानकाच्या आवारातील स्वच्छता मोहीम राबविली. या बरोबरच चालक-वाहक विश्रांती आणि स्वागत कक्षाबरोबरच स्वच्छतागृहांची स्वच्छता या कालावधीत करण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ स्थानकांमध्ये करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात स्वच्छता होतानाचे चित्र अभावानेच दिसले. रोजच प्रवाशांची ये-जा असल्यामुळे दैनंदिन स्वच्छता महत्त्वाची ठरते. त्यातच कोरोनाचा प्रभाव आणि आता नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमुळे सतर्कता तितकीच महत्त्वाची आहे.