अनेक संस्था-संघटनांसह शासनाकडून दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड केली जाते. परंतु एकदा वृक्षारोपण झाल्यानंतर त्याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही. निसर्गानेच ते जगले-वाचले तर वाढते, बाकी बरीच वृक्षरोपे जळून नष्ट होतात. त्यामुळे वृक्षारोपणाची मोहीम ही केवळ देखावा असते. त्यामुळेच केवळ खड्डे खोदून वृक्षारोपण करून त्याचे संगोपन होत नसल्याची बाब घोटेवाडी ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आली. त्यामुळे प्रत्येक कुटुंबास केशर आंब्याचे एक रोप देण्याचा आणि ग्रामस्थांकडून त्याचे संगोपन करून घेण्याचा हा आदर्शवत उपक्रम ग्रामपंचायतीने हाती घेतला आहे. मंजुश्री भरत घोटेकर, उपसरपंच रंजना चंद्रभान घोटेकर यांच्यासह सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांना घरटी एक याप्रमाणे केशर आंब्याच्या रोपांचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांनी घरासमोर, शेतातील बांधावर रोपांची लागवड केली. पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने ग्रामपंचायतीने हाती घेतलेल्या उपक्रमाचे गावकऱ्यांनी स्वागत केले आहे.
कोट...
फळांचे झाड म्हणून ग्रामस्थांकडून केशर आंब्याचे संगोपन होईल आणि दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या वृक्षलागवडीचा उद्देशही सफल होईल, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यातून ५ वर्षांत किमान २ हजार झाडांची लागवड आणि संगोपन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
- मंजुश्री घोटेकर, सरपंच, घोटेवाडी
फोटो - १७घोटेवाडी ट्री
- ‘एक कुटुंब, एक झाड’ उपक्रमांतर्गत घोटेवाडी ग्रामस्थांना केशर आंब्याच्या रोपांचे वाटप करताना सरपंच मंजुश्री भरत घोटेकर, उपसरपंच रंजना घोटेकर, चंद्रभान घोटेकर, हौशीराम घोटेकर, संतोष सरोदे, नानासाहेब यादव आदी.
170721\17nsk_18_17072021_13.jpg
फोटो - १७घोटेवाडी ट्री - ''एक कुटुंब, एक झाड'' उपक्रमांतर्गत घोटेवाडी ग्रामस्थांना केशर आंब्याच्या रोपांचे वाटप करताना सरपंच मंजुश्री भरत घोटेकर, उपसरपंच रंजना घोटेकर, चंद्रभान घोटेकर, हौशीराम घोटेकर, संतोष सरोदे, नानासाहेब यादव आदी.