दिंडोरी : तालुक्यातील वणी येथे पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या दुर्मीळ उदमांजरास सर्पमित्राने सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले.वणी येथील धनंजय शिरसाट यांच्या शेतातील ५० फूट खोल विहिरीत कोणतातरी प्राणी पडल्याचे लक्षात आले. त्यांनी वनरक्षक यू. जी. सैयद यांना माहिती दिली. सैयद यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्पमित्र दीपक धामोडे यांना बोलावून घेतले. धामोडे यांनी सैयद यांच्या सहकार्याने विहिरीत पडलेल्या उदमांजरास सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. पाण्याच्या शोधात मांजर विहिरीत पडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मांजरास ओझरखेड वनउद्यानात सोडून देण्यात आले. याकामी नवनाथ डंबाळे, विजय उगले, संदीप गोसावी, हुसेन सैयद, अजय काकड यांनी मदत केली.सदर घटनेची वनविभागात नोंद करण्यात आली.
विहिरीत पडलेल्या उदमांजरास जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 6:17 PM