मालेगाव : येथील गिरणा बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेले तीन जण पाण्यात बुडाल्याने त्यांना अग्निशमन दलाचा जवान शकील अहमद मोहंमद साबीर याने आपला जीव धोक्यात घालून त्यांना वाचविले.सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गिरणा बंधाऱ्यात तीन जण बुडाल्याची माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख संजय पवार यांना माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी दूरध्वनीवरून दिली. प्रभारी आयुक्त अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आदेश दिल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान गिरणा बंधाऱ्याकडे रवाना झाले. गिरणा बंधाऱ्यातून सध्या पूरपाणी ओसंडून वाहत असून, पाण्यात पोहणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. दरवर्षी पाण्यात बुडून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. मनपाच्या अग्निशमन दलाचा तैराक शकील अहमद याने लाईफरिंग व दोराच्या सहाय्याने बंधाऱ्यात बुडालेल्या अंजूम अख्तर मोहंमद इस्माईल (२२), मोहंमद इस्त्राईल (१८) व अन्वर शेख (१७) यांना एकेकाला पाण्यातून बाहेर काढल्याने त्यांना जीवदान मिळाले. पोहताना पाण्याच्या प्रवाहात तिघे तरुण अडकल्याणे सुमारे पाऊणतास त्यांचा संघर्ष सुरू होता. लोकांनी आरडाओरड केली. माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी अग्निशलन दलाला दूरध्वनी करून घटनास्थळाची माहिती दिली. वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतल्याने तिघांचे प्राण वाचू शकले. यात अग्निशमन दलाचे विकास बोरगे, मनोहर तिसगे, दिनकर गवते, सुनील बागुल, सागर बच्छाव, वासीफ शेख, दस्तगीर शेख या जवानांनी बचाव कार्यात मदत केली. (प्रतिनिधी)
मालेगावी गिरणा बंधाऱ्यात बुडणाऱ्या तिघांना जीवदान
By admin | Published: August 09, 2016 12:41 AM