दिंडोरी : मुंबईत ताडीच्या दुकानांना ताडीत मिक्स करण्यात येणारे क्लोरल हायड्रेड या विषारी ड्रगचा दिंडोरी तालुक्यातील अल्फा सोलव्हेन्ट या कंपनीतून पुरवठा होत असल्याचा छडा मुंबई येथील खार पोलिसांनी लावल्याने दिंडोरी तालुक्यात खळबळ उडालीआहे.दोन वर्षांपूर्वी मुंबईच्या उत्पादन शुल्क विभागाने सदर कंपनीत तपासणी करून मोठा साठा जप्त करीत कारवाई केली होती. त्याच कंपनीतून पुन्हा तेच ड्रग ताडीत भेसळ करण्यासाठी जात असल्याचे उघड झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दरम्यान, सदर छाप्याबाबत कमालीची गोपनीयता पाळली गेली असून, स्थानिक पोलीस व उत्पादन शुल्क विभागही अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.मुंबई आरे पोलिसांच्या हद्दीत मोडणाºया युनिट १ आणि ३१ मध्ये खार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दया नायक यांनी मुंबईतील २५० ताडीच्या दुकानांना क्लोरल हायड्रेड या विषारी ड्रग केमिकलचा पुरवठा करणाºयाव्यंकटा करबुय्याला (४६) त्याच्या अन्य दोन साथीदारांसह अटक केलीहोती. त्यांच्याकडून ४५ लाख ३४ हजार ३०० रुपयांचे केमिकलही हस्तगत करण्यात आले होते; मात्र लोकांच्या जिवाशी खेळणारे हे ड्रग केमिकल त्यांनी कुठून आणले याबाबत चौकशी सुरू होती.खार पोलिसांनी तपासाअंती नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील लखमापूर शिवारातील अल्फा सोलव्हेन्ट येथून सदर केमिकल जप्त करीत सदर कंपनी मालकालाही ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. याबाबत स्थानिक पोलीस, उत्पादन शुल्क विभागाशी संपर्कसाधला असता त्यांनी आपणास याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान, पुन्हा तेच केमिकल सापडल्याने व मुंबई पोलिसांनी ताडी भेसळीचा पर्दाफाश करीत सदर केमिकल जप्त केल्याने खळबळ उडाली असून, राज्य उत्पादन शुल्क विभाग संशयाच्या भोवºयात सापडले आहे.सदर कंपनीत नव्याने काही मशिनरी आल्या होत्या व येथे बºयाचवेळा रात्रीच्या वेळी कामकाज होत असल्याची परिसरात चर्चा आहे.दोन वर्षापूर्वीही झाली होती कारवाईयापूर्वी ३ व ४ जानेवारी २०१७ ला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सुनील चव्हाण, उपायुक्त प्रसाद सुर्वे आदींच्या पथकाने तपासणी करीत क्लोरल हायड्रेड ३० किलोच्या नव्वद गोण्या व १०६ कच्च्या रसायनाचे ड्रम जप्त करून व्यवस्थापकासह चार जणांना अटक केली होती. त्यावेळीही स्थानिक प्रसारमाध्यमांना माहिती देण्यास टाळाटाळ झाली होती.
कंपनीवरील कारवाईबाबत स्थानिक पोलीस अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 1:19 AM