नाशिक : सिन्नर-घोटी रस्त्यावरील बेलू शिवारातील मातोश्री फार्महाऊसवर स्थानिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून आयपीएल सट्टेबाजांच्या मुसक्या आवळल्या. येथून तीघा सट्टेबाज संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सुमारे पावणे सहा लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबत ग्रामिण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इंडियन प्रिमियर क्रि केट लिग (आयपीएल.) क्रि केट मालिकेच्या ज्वर देशभरात पहावयास मिळत असून या पार्श्वभूमीवर विविध सामन्यांवर सट्टा लावला जात आहे. या सट्टा लावणाऱ्यांमध्ये तरूणाई अग्रेसर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर नाशिक शहर, ग्रामीण भागात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी सट्टेबाजांचे अड्डे शोधून उदध्वस्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शनिवारी रात्री सुरू असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाब व रॉयल चॅलेंजर बंगळुरू या संघांचा क्रि केट सामना सुरू होता. फार्महाऊस मध्ये सदर सामन्यावर बेटींग सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील नाईक, नवनाथ गुरूळे, रामभाउ मुंढे, रवि शिलावट, पोलीस हवालदार दिपक आहिरे, शिवाजी जुंदरे, प्रितम लोखंडे, हेमंत गिलिबले, निलेश कातकाडे यांच्या पथकाने बेलु गावाच्या शिवारात मातोश्री फार्म हाऊसवर छापा टाकला. या ठिकाणी तीघा संशियतांना ताब्यात ेघेण्यात आले. प्रेम ताराचंद थावराणी, हरी उर्फ बॉबी प्रेम थावराणी, जय अभय राव ( तीघे रा. सौभाग्य नगर, देवळाली कॅम्प) यांना अटक करण्यात आली आहे. हे तिघेही आयपीएल. सामन्यावर त्यांचे ताब्यातील लॅपटॉप व मोबाईलव्दारे लोकांकडुन पैसे लावून घेत सट्टा खेळतांना व खेळवितांना मिळुन आले. या छाप्यात त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांचे 7 मोबाईल फोन, १ डेल कंपनीचा लॅपटॉप, १सोनी ब्राव्हीया कंपनीचा टी.व्ही., १ टाटा स्काय कंपनीचा सेट टॉप बॉक्स, तसेच एक फोक्सवॅगन कंपनीची वेंटो कार असा एकुण ५ लाख७८ हजार 600 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांंच्याविरूध्द सिन्नर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.हरी सराईत सट्टेबाजयातील आरोपी हरि उर्फ बॉबी थावराणी हा क्रि केट सामन्यांवर बेटींग लावणारा सराईत गुन्हेगार असल्याचे तपासतातून पुढे आले आहे. त्याच्यावर यापुर्वी नाशिक शाहरातील उपनगर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदयान्वये गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्थानिक ग्रामीण गुन्हे शाखा : फार्महाऊसवर छापा; आयपीएल सट्टेबाजांच्या आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 4:30 PM
या छाप्यात त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांचे 7 मोबाईल फोन, १ डेल कंपनीचा लॅपटॉप, १सोनी ब्राव्हीया कंपनीचा टी.व्ही., १ टाटा स्काय कंपनीचा सेट टॉप बॉक्स, तसेच एक फोक्सवॅगन कंपनीची वेंटो कार असा एकुण ५ लाख७८ हजार 600 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ठळक मुद्देसिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा मातोश्री फार्म हाऊसवर छापा