पिंपळगाव बसवंत : दरवर्षी राष्ट्रीय महामार्ग प्रधारीकरण विभागा मार्फत १ एप्रिल पासून दरवाढ केली जाते, मात्र यावेळी स्थानिकांनाही टोल भरावा लागणार असल्याने पुन्हा एकदा टोल नाका दरवाढीला विरोध होऊ लागला आहे. कामे अपूर्ण असतांना कोणत्या आधारावर पीएनजी टोल वे कंपनी दर वाढ करत आहे, असा सवालही यावेळी वाहन चालक व वाहन संघटनांकडून केला जात आहे.महाराष्ट्रातील सगळ्यात महागडा टोलनाका म्हणून पिंपळगाव बसवंत येथील पीएनजी टोलनाका ओळखला जातो. त्यामुळे हा टोलनाका अनेक संदर्भात चर्चेत तसेच वादात असतो. आतातर १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ पर्यंतची दर वाढ होऊन त्यात स्थानिकांनाही २८५ रुपयांचा पास बंधनकारक असल्याचे दर पत्रक व जाहीर नोटीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी सादर केली आहे. त्यामुळे आता स्थानिकांनाही पैसे मोजावे लागणार असल्याने या दरवाढीला मात्र स्थानिक वाहन चालक, वाहन संघटना व ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला असल्याने पुन्हा या टोलनाक्यामुळे वाद निर्माण झाला आहे.राष्ट्रीय महामार्ग प्रधारीकरण विभागामार्फत १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत अधिकची दर वाढ होणार आहे त्या बाबतची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्थानिक वाहनधारकांवर २० किमी अंतराच्या परिसरात राहणाऱ्या स्थानिक विना व्यावसायिकांना देखील दरमहा २८५ रुपये टोल भरावा लागणार असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.मागील व सध्याचे वाढविलेले दरतपशील - २०२०- २१ / २०२१- २२कार, जीप, व्हॅन - १४५ १५०मिनी बस - २३५ २४५बस ट्रक - ४९० ५१०३ अँक्सल - ५३५ ५५५४ ते ६ अँक्सल - ७७० ८००७ अँक्सल - ९४० ९७५राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्थानिक वाहनांना टोल द्यावा लागणारी भूमिका अतिशय चुकीची असून आम्हाला दररोज पिंपळगाव येथील बाजारपेठ जावे लागते. त्यामुळे पिंपळगाव टोल प्रशासनाने आम्हाला पूर्वीप्रमाणेच टोल शुल्कापासून मुक्तता द्यावी.- विलास पावर, स्थानिक वाहनचालक.
सदर दरवाढीचे पत्रक हे राष्ट्रीय प्राधिकरण विभाग कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले असून मात्र स्थानिक वाहनधारकाना हे मान्य नसल्याने वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांशी या बाबत चर्चा केली जाणार आहे.- नवनाथ केदारे, व्यवस्थापक, पिंपळगाव टोलनाका.तर आम्ही टोलनाकाच बंद करुदरवेळेस पिंपळगाव टोल नाक्यावर दरवाढीचा भडका सुरु असतो. कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत दरवाढ करून वाहन धारकांना भुर्दंड देण्याचे षड्यंत्र टोलनाका प्रशासनाकडून सुरु असते. आता स्थानिकांना देखील १ एप्रिलपासून टोल भरावा लागणार ही मात्र सर्रास लुटमारच म्हणावी लागणार असे होऊ देणार नाही आम्ही टोल नाकाच बंद करू- रोहित कापुरे, स्थानिक वाहन चालक.