नाशिक रोडचा सराईत गुंड संशयित अक्षय याच्याविरुद्ध परिसरातील नागरिकांना बळजबरीने धमकावणे, दंगल माजविणे, शस्त्रांचा धाक दाखवीत दहशत पसरविणे, घरे बळकाविणे, विनापरवाना हत्यारांसह गावठी कट्टे वापरल्याप्रकरणी विविध गुन्हे दाखल आहेत. त्याला २०१९ साली तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये स्थानबद्ध करण्यात आले होते. मात्र, कारागृहातून बाहेर पडल्यानंतर अक्षय याने पुन्हा गुन्हेगारी करण्यास सुरुवात करत नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण केला होता.
अश्विनी कॉलनी, अरिंगळे मळा, सिन्नर फाटा, गायकवाड मळा, गोरेवाडी, रेल्वे स्टेशन आणि परिसरातील दहशत लक्षात घेता व त्याच्यावर असलेल्या गंभीर गुह्यांची दखल घेत पुन्हा स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. फेब्रुवारीपासून आतापर्यंत पाण्डेय यांच्या आदेशान्वये पाच गुन्हेगारांना आतापर्यंत एमपीडीए कायद्यान्वये गजाआड करण्यात आले आहे.