लोहोणेर : गेल्या चार महिन्यांपासून ऊसपुरवठा केलेल्या वसाका कारखान्याने ऊसबिल वेळेवर अदा न केल्याने गेल्या दहा दिवसांपासून लावलेले कुलूप वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी, आमदार डॉ. राहुल अहेर यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर आज वसाकाचे प्राधिकृत मंडळ, आजी-माजी संचालक, सभासद व कामगारांच्या उपस्थितीत उघडण्यात आल्याने वसाका व्यवस्थापनाने अखेर सुटकेचा नि:श्वास टाकला.सन २०१७-१८च्या गाळप हंगामात वसाकाला ऊस उत्पादकांनी ऊसपुरवठा केला होता. मात्रसाखरेचे कोसळते भाव व आर्थिक अडचणींमुळे वसाका व्यवस्थापनाच्या वतीने वेळेवर उत्पादकांचे देणेशक्य न झाल्याने गेल्या १५ तारखेला संतप्त उत्पादकांच्या वतीने वसाकाला कुलूप लावण्यात आले होते.या पार्श्वभूमीवर गुरुवारी वसाका कार्यस्थळावर उत्पादक सभासद, पुरवठादार व कामगार यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन अहेर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.वसाकाची सर्वस्वी जबाबदारी आपण घेतली असून, अत्यंत खडतर व बिकट परिस्थितीत वसाका चालू करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. सभासदांना दिलेल्या शब्दाला आपण बांधील असून, इतर कारखान्याच्या तुलनेत वसाकाही उसाला भाव देईन त्यासाठी सभासदांनी निश्चिंत रहावे. साखरेच्या कोसळत्या भावामुळे ऊस उत्पादकांच्या पदरात पैसे टाकण्यासाठी उशीर झाला; मात्र येणाऱ्या साखर विक्र ीतून येणाºया पैशातून हजार रुपये हप्ता आणि येत्या १५ आॅगस्टपर्यंत उर्वरित रक्कम वर्ग केले जाईल. कुलूप लागल्याने सुमारे ४० लाखांचे आर्थिक नुकसान झाले असून, या नुकसानीस जबाबदार कोण, असा सवालही डॉ. अहेर यांनी यावेळी केला.
‘वसाका’चे कुलूप दहा दिवसांनी उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 11:01 PM
लोहोणेर : गेल्या चार महिन्यांपासून ऊसपुरवठा केलेल्या वसाका कारखान्याने ऊसबिल वेळेवर अदा न केल्याने गेल्या दहा दिवसांपासून लावलेले कुलूप वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी, आमदार डॉ. राहुल अहेर यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर आज वसाकाचे प्राधिकृत मंडळ, आजी-माजी संचालक, सभासद व कामगारांच्या उपस्थितीत उघडण्यात आल्याने वसाका व्यवस्थापनाने अखेर सुटकेचा नि:श्वास टाकला.
ठळक मुद्देराहुल अहेर : इतर कारखान्यांच्या बरोबरीने उसाला भाव देणार