नाशिक : शहरात कोरोना बाधीतांची संख्या नियंत्रणाबाहेर जात असून एकाच दिवसात आठ जणांचा बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. लॉक डाऊनचे निर्बंध शिथील होताच उसळलेल्या गर्दींनंतर ससंर्ग वाढत चालल्याने शहरात चार ते पाच दिवस कडकडीत लॉक डाऊन जाहिर करावे अशी मागणी भाजपाच्या पदाधिका-यांनी मंगळवारी (दि. १७) आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे. शहरात कोरोना बाधीतांची संख्या सातशे पार गेली आहे. तर मृत्यूचा आकडा देखील चाळीसच्या वर गेला आहे त्या पाार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.१७) आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती अध्यक्ष गणेश गीते, सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील आदी पदाधिका-यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेतली आणि कोरोनाबाबत कठोर उपाययोजना करण्याबाबत बैठक घेतली. यावेळी आयुक्त गमे यांनी शहरात केल्या जाणा-या उपाययोजनांचे सादरीकरण केले. याबाबत आयुक्तांनी सादरीकरण केले.याबाबत जिल्हास्तरीय बैठकीत व राज्य सरकारच्या सोबत होणार्या व्हिडीओे कॉन्फरिन्संग दरम्यान चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले. यावेळी नगरसेवक प्रशांत जाधव, श्याम बडोदे मान्यवर उपस्थित होते.
शहर चार दिवस कडकडीत लॉकडाऊन करा - भाजपाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 8:56 PM
नाशिक शहरात एकाच दिवसात आठ जणांचा बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. लॉक डाऊनचे निर्बंध शिथील होताच उसळलेल्या गर्दींनंतर ससंर्ग वाढत चालल्याने शहरात चार ते पाच दिवस कडकडीत लॉक डाऊन जाहिर करावे अशी मागणी भाजपाच्या पदाधिका-यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे.
ठळक मुद्देनाशिक शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू कराशहरातील वाढत्या संसर्गामुळे भाजपची मागणी