नाशिक- नाशिक महापालिकेची सिटीलींक बस सेवा ग्रामीण भागात देण्याठी देण्यात येते. त्याचप्रमाणे अतिरिक्त प्रवासी घेतल्यास केवळ रिक्षा चालकांवरच कारवाई केली जात असल्याच्या निषेधार्थ आज नाशिक मधील रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी बंद पुकारला असून त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.
नाशिक महापालिकेच्या वतीने सिटीलींक ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा महापालिका हद्दीपासून वीस किलोमीटर अंतरापर्यँत म्हणजे ग्रामीण भागात देण्यात येत असल्यामुळे या परिसरातील काळी पिवळी टॅक्सी चालकांचे हाल होत असून त्यांना प्रवासी मिळत नाही. त्याचप्रमाणे शहरात रिक्षा चालकांनी अतिरिक्त प्रवासी बसल्यास बसवल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते मात्र सिटीलिंक मध्ये 40 टक्के अधिक प्रवासी बसवण्यास परवानगी देण्यात आली आहे अशी श्रमिक सेनेची तक्रार आहे त्यामुळे आज दिवसभरासाठी बंद पुकारण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचे श्रमिक सेनेचे नेते सुनील बागुल यांनी सांगितलं.