नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, आता दिवसाकाठी ६० ते ७० जणांना कोरोना संसर्ग होत असल्याचे आढळत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतरच ही परिस्थिती उद््भवली आहे. त्यामुळे आता शहरात पुन्हा लॉकडाऊन करून निर्बंध वाढविण्याबाबत राज्य शासन निर्णय घेणार आहे. यासंदर्भात दोन दिवसांपासून शासनाकडून आढावा घेण्यात आला आहे. ताजी माहितीदेखील महापालिकेने शासनाला दिली आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकरच शासन निर्णय घेऊ शकेल, अशी माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीदिली. शहरात कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. सुरुवातीला ४० ते ५० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत होते. आता तर ५० ते ६० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. शहरात गेल्या ६ जूनपासून बाजारपेठा खुल्या करण्यास परवानगी दिल्यानंतर प्रचंड गर्दी होऊ लागली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आणि दुसºयाच दिवशी शहरातील बाजारपेठांमध्ये दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सवलत दिली. त्यामुळे गर्दी कमी होईल ही अपेक्षा फोल ठरली आणि आणखी गर्दी वाढली.त्यातच आता शहरात रुग्णसंख्या प्रचंड वाढली असून, आठ जणांचा तर मृत्यू झाल्याने आता शहरात पुन्हा निर्बंध घालण्याची मागणी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ‘लोकमत’शी बोलतानाही माहिती दिली.------------------४शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी त्यापेक्षा कोरोनामुळे होणारे मृत्यू वाचविण्याचे आव्हान असल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. शहरात कोरोना संसर्ग शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग करण्यात येत असून, त्यामुळे बाधितांची संख्यादेखील वाढण्याची शक्यता आहेआणखी तीनशेबेड््स वाढविणारशहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, ती कमी होण्याची चिन्हे नसल्याने पूर्वतयारीचा भाग म्हणून आणखी तीनशे खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे.------------------४बाजारपेठा खुल्या करण्यास परवानगी दिल्यानंतर प्रचंड गर्दी होऊ लागली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला.४शहरातील बाजारपेठांमध्ये दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सवलत दिली. त्यामुळे गर्दी कमी होईल ही अपेक्षा फोल ठरली. आवाहन करूनही नागरिक रस्त्यावर.४बाजारपेठेतील गर्दी कमी करण्यासाठी सम-विषम फॉर्म्युलाचेदेखील पालन होत नसल्याने कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.------------------शहरात बाधितांची संख्या वाढली असून, निर्बंध शिथिल झाल्यानंतर नागरिक कोरोनाबाबत स्वयंशिस्त बाळगत नसल्याने संसर्ग वाढत आहे. शहरात निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी स्थितीचे निरीक्षण करण्यात येत आहे. या संदर्भातील माहिती शासनाला माहिती दिली जात आहेत.- राधाकृष्ण गमे, आयुक्त, मनपा
शहरात पुन्हा लॉकडाऊन शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 11:16 PM