लासलगाव : ओझरखेड धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडले जाणार असून, यास परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. निफाडचे माजी आमदार दिलीप बनकर, पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे यांच्यासह अनेक नेत्यांनीशुक्र वारी या धरणाच्या गेटला कुलूप लावून आपला विरोध व्यक्त केला.ओझरखेड कालव्याचे पाणी सोडू नये या मागणीसाठीओझरखेड कालवा क्षेत्रातील पाणी वापर संस्था, लाभार्थी गावचे सरपंच व कार्यक्षेत्रातील शेकडोशेतकरी ओझरखेड धरणावर आले व मुख्य गेटला कुलूप लावले. दत्तू डुकरे, दत्ता रायते, माधवराव ढोमसे यांच्यासह शेकडो शेतकºयांनी ओझरखेडवर धडक दिली. कॅनॉलचे पाणी जायकवाडीला देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.मध्ये शेकडो शेतकºयांचा जमाव या ठिकाणी स्वस्फुर्तीने जमा झाला होता. त्यामुळे अधिकाºयांची तारांबळ उडून सर्व अधिकारी तातडीने धरणावर हजर झाले व आपली भूमिका वरिष्ठ अधिकारी तसेच शासनापर्यंत लवकरात लवकर पोहोचू असे आश्वासन त्यांनी शेतकºयांना दिले.यावेळी शरद काळे, रावसाहेब रायते, मोतीराम रायते,विठ्ठल कहाने, सारोळे सरपंच कैलास भोसले, वनसगाव सरपंच उमेश डुंबरे, योगेश रायते, ईश्वर शिंदे, चांगदेव शिंदे, संतोष बोराडे,रामनाथ शिंदे, नंदू काळे, शंकर शिंदे, दत्ता मापारी, नंदू खुर्द दादासाहेब खराटे, तसेच विविध गावांतील पाणीवापर संस्थांचे चेअरमन व सरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.(फोटो २६ लासलगाव, लासलगाव १)
ओझरखेड धरणाच्या गेटला लावले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 1:11 AM