मालेगाव : तालुक्यातील टाकळी येथील श्रीरामनगर जिल्हा परिषद शाळेतील रिक्त असलेले शिक्षकाचे पद तातडीने भरावे तसेच नियुक्त केलेले शिक्षक कायम गैरहजर राहत असल्यामुळे संबंधित शिक्षकावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी व पालकांनी शनिवारी शाळेला कुलूप ठोकले होते.टाकळी येथील श्रीरामनगर प्राथमिक शाळेत गेल्या वर्षभरापासून शिक्षकाची नियुक्ती नव्हती. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आनंद चव्हाणनामक शिक्षकाची नेमणूक करण्यात आली. मात्र चव्हाण शाळेत हजरच झाले नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सरपंच योगिता शेवाळे, उपसरपंच समाधान शेवाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनकर बोरसे यांच्या नेतृत्वाखाली शाळेला कुलूप ठोकले होते. (प्रतिनिधी)
श्रीरामनगर प्राथमिक शाळेला ठोकले कुलूप
By admin | Published: March 05, 2017 12:19 AM