लोहोणेर : नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा कायाकल्प व आनंदीबाई जोशी पुरस्कार या वर्षी लोहोणेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे व आरोग्य सभापती यतिन पगार यांच्या हस्ते रावसाहेब थोरात सभागृहात प्रदान करण्यात आला. लोहोणेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने येथील वैद्यकीय अधिकारी योगेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करीत रुग्णसेवेत तत्परता दाखविली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिष्ठेचा मानला जाणारा कायकल्प व आनंदीबाई जोशी पुरस्कार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे व आरोग्य सभापती यतिन पगार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मनीषा पवार, सुनीता चारोसकर, अर्पणा खोसकर, नयना गावित आदी मान्यवर उपस्थित होते. लोहोणेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने दाणी, सुरेश पाटील, पवार, पगार, सोनाली पाटील आदींनी हा पुरस्कार स्वीकारला.
लोहोणेरच्या आरोग्य केंद्रास पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 11:53 PM