लोहोणेर : येथील रहिवासी दीपक जयपालसिंह परदेशी (३५) या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या संदर्भात देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. गळफास घेण्याची पंधरा दिवसांत लोहोणेर गावातील ही दुसरी घटना आहे. मयत दीपक परदेशी हा चारचाकी गाडीचा चालक म्हणून लोहोणेर येथे काम करीत होता. शनिवारी दुपारी त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी त्याची पत्नी शेतीकामासाठी गेली होती. त्याची लहान मुले घरात आल्या नंतर सदर प्रकार उघडकीस आला. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. येथील रहिवासी विलास परदेशी यांचे ते बंधू होत. देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी लोहोणेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या संदर्भात देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे़
लोहोणेरला युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 1:51 AM