लोकमत न्यूज नेटवर्कलोहोणेर : नाशिक जिल्ह्यात तसेच देवळा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोहोणेर ग्रामपंचायत ग्राम कोरोना समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने दि. २ ते दि. ४ जुलपर्यंत लोहोणेर गावातील संपूर्ण यवहार बंद करण्यात आले आहेत. तसेच दर गुरु वारी भरणारा आठवडे बाजार शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद राहील याची परिसरातील ग्रामस्थांनी, शेतकरी व भाजीपाला विक्र ेते यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.रविवारपासून (दि. ५) किराणा, हार्डवेअर इतर दुकाने व भाजीपाला इत्यादी दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ यावेळेत सुरू राहतील. कृषी सेवा केंद्र सकाळी ७ ते सायंकाळी ७ यावेळेत सुरू राहतील.भाजीपाला भर चौकात किंवा स्टँडवर विक्र ी करता येणार नाही. तसे आढळल्यास माल जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. बाहेरगावातील विक्र ेत्यांनी भाजीपाला व आंबा विक्र ीसाठी लोहोणेर गावात येऊ नये. हॉटेल व्यावसायिकांनी फक्त पार्सल सुविधा सुरू ठेवावी. वैद्यकीय आणि मेडिकल सेवा २४ तास सुरू राहतील. मास्क न वापरणाऱ्या नागरिकास १०० रुपये दंड आकारण्यात येईल.वरील सर्व सूचनांचे नागरिकांनी पालन करून ग्रामपंचायत प्रशासनास व ग्रामकोरोना समितीस सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच जयवंता बच्छाव, उपसरपंच रेश्मा महाजन, ग्रामपंचायत सदस्य यू. बी. खैरनार यांनी केले आहे.
लोहोणेर तीन दिवस बंदचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 10:19 PM
लोहोणेर : नाशिक जिल्ह्यात तसेच देवळा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोहोणेर ग्रामपंचायत ग्राम कोरोना समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने दि. २ ते दि. ४ जुलपर्यंत लोहोणेर गावातील संपूर्ण यवहार बंद करण्यात आले आहेत. तसेच दर गुरु वारी भरणारा आठवडे बाजार शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद राहील याची परिसरातील ग्रामस्थांनी, शेतकरी व भाजीपाला विक्र ेते यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देकृषी सेवा केंद्र सकाळी ७ ते सायंकाळी ७ यावेळेत सुरू राहतील.