लोकमत इन्फेकटलोहोणेर : लोहोणेर गावाच्या बाहेरून जाणाऱ्याा लोहोणेर-वासोळं रस्त्याच्या दुर्दशेसंदर्भात शुक्रवारी (दि.२) लोकमत मधून ‘रस्त्यावरचे पाणी वस्तीत’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाला खडबडून जाग आली असून कालच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर खडी व मुरुम टाकून सदर खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली.तर आज चक्क याठिकाणी अल्प प्रमाणात खडी टाकून त्यावर मुरूम टाकून सदर खड्डा बुजण्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाल्याने या रस्त्या लगत असलेल्या भिल्ल समाज वस्तीतील रिहवाशीनी लोकमतच्या वृत्ता मुळे सदर काम सुरू झाल्याने धन्यवाद व्यक्त केले.लोहोणेर-वासोळं रस्त्याच्या दुर्दशेचे सविस्तर वृत्त दि. २ आॅगस्ट रोजी छायाचित्रा सहित सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने दखल घेऊन सदरचा जीवघेणा खड्डा बुजविण्यास आज प्रत्यक्ष कामास सुरवात केल्याने या रस्त्याच्या बाजूला असलेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असला तरी या रस्त्यावरील पाणी आमच्या घरात घुसू नये म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना साकडेही घातले.असता याठिकाणी संरक्षण भिंत बांधून देण्याचे आश्वासन या अधिकार्यांनी यावेळी येथील नागरिकांना दिले. आज याठिकाणी सुरवातीस अल्प प्रमाणात खडी टाकून व नंतर मुरूम टाकून हा खड्डा बुजविण्यास आला असल्याने वाहतुकीस सोयीस्कर झाल्याने येथील पादचारी व दुचाकीस्वार व चारचाकी वाहन धारकांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.(फोटो ०३ लोहोणेर)टीप : - याबाबतचे सविस्तर वृत्त काल दि. २ आॅगस्ट च्या अंकात छायाचित्रांसह प्रसिद्ध झाले आहे.
लोहोणेर-वासोळं रस्त्यावरील ‘ते’ खड्डे खडी टाकून बुजण्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 10:42 PM
लोहोणेर : लोहोणेर गावाच्या बाहेरून जाणाऱ्याा लोहोणेर-वासोळं रस्त्याच्या दुर्दशेसंदर्भात शुक्रवारी (दि.२) लोकमत मधून ‘रस्त्यावरचे पाणी वस्तीत’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाला खडबडून जाग आली असून कालच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर खडी व मुरुम टाकून सदर खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली.
ठळक मुद्देपादचारी व दुचाकीस्वार व चारचाकी वाहन धारकांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.